घरठाणेमहापालिका उपायुक्तांच्या सहीचे बनावट नियुक्ती पत्र; पालिका कर्मचाऱ्यासह एकाला अटक

महापालिका उपायुक्तांच्या सहीचे बनावट नियुक्ती पत्र; पालिका कर्मचाऱ्यासह एकाला अटक

Subscribe

धक्कादायक बाब म्हणजे हे करणारा दुसरा तिसरा कोणी नसून महापालिकेचा कर्मचारी आहे. या प्रकरणी मध्यवर्ती पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. यात मोठं रॅकेट समोर येण्याची शक्यता आहे.

उल्हासनगर महापालिका उपायुक्तांच्या सहीचे बनावट नियुक्ती पत्र देऊन अनेकांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे हे करणारा दुसरा तिसरा कोणी नसून महापालिकेचा कर्मचारी आहे. या प्रकरणी मध्यवर्ती पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. यात मोठं रॅकेट समोर येण्याची शक्यता आहे.

उल्हासनगर महापालिकेचा सफाई कर्मचारी कैलास शेडगे याने चेतन खरवडे याला महापालिकेत विद्युत विभागात कामाला लावण्यासाठी महापालिका उपायुक्त अशोक नाईकवाडे यांच्या सहीचे बनावट नियुक्ती पत्र दिले. दरम्यान हा प्रकार उपायुक्त नाईकवाडे यांना समजताच त्यांनी उल्हासनगर मध्यवर्ती पोलीस ठाण्यात या प्रकरणी तक्रार केली. त्यानंतर पोलिसांनी महापालिका कर्मचारी कैलास शेडगे आणि त्याचा साथीदार राजू चौहान याला अटक केली. या दोघांनी अनुकंपा आणि वारस हक्कावर कामाला लावण्याच्या नावाखाली  अनेकांची फसवणूक केली असल्याची शक्यता आहे. अशा नागरिकांनी तात्काळ पोलिसांशी संपर्क करण्याचे आवाहन उपायुक्त अशोक नाईकवाडे यांनी केले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – पदवी परीक्षांसाठी CET परीक्षा नाही, १२वीच्या गुणांवरच पदवीचे प्रवेश – उदय सामंत

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -