घरठाणेGas Cylinder Exploded: कळव्यात गॅस सिलिंडरचा स्फोट, चौघे जखमी

Gas Cylinder Exploded: कळव्यात गॅस सिलिंडरचा स्फोट, चौघे जखमी

Subscribe

कळवा पूर्व शिवशक्ती नगर येथील बैठ्या चाळीत गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याची घटना रविवारी रात्री साडे अकराच्या सुमारास घडली. या स्फोटात घराचे पत्रे फुटले असून घरात असलेले चौघे जण जखमी झाले आहेत. ते चौघे त्या परिसरात असलेल्या गॅस एजन्सीमधील कामगार असून त्यांना उपचारार्थ कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल केले आहे, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली.

- Advertisement -

कळवा पूर्व शिवशक्ती नगर परिसरात रणजित सिंग यांच्या मालकीची भारत गॅस नामक एजन्सी आहे. तेथे काम करणाऱ्या कामगारांसाठी त्यांनी त्याच परिसरात बैठ्या चाळीत रूम घेऊन दिली आहेत. त्या रूममधील गॅस सिलिंडरचा स्फोट रविवारी रात्री साडे अकराच्या सुमारास झाला त्यावेळी घरामध्ये सत्यम मंगल यादव (२०), अनुराज सिंग (२९), रोहित यादव(२०) आणि गणेश गुप्ता(१९) हे कामगार असल्याने ते भाजले आहेत. त्यांना उपचारार्थ कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल केले. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि कळवा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. तर भाजलेल्या कामगारांना तातडीने उपचारार्थ रुग्णालयात दाखल केल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अविनाश सावंत यांनी दिली.


हेही वाचा – ठाण्यात स्ट्रीट लाईट पोलला धडकून झालेल्या अपघातात कारमधील चौघे जखमी


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -