घरक्राइमOLXवरून स्वस्तात वस्तू देण्याचे आमिष दाखवून सव्वासात लाख रुपयांची फसवणूक

OLXवरून स्वस्तात वस्तू देण्याचे आमिष दाखवून सव्वासात लाख रुपयांची फसवणूक

Subscribe

ऑनलाईन फसवणुकीच्या गुन्ह्यांतील दोन सराईत आरोपींना वर्सोवा पोलिसांच्या एका विशेष पथकाने अटक केली आहे. या दोघांनी ओएलएक्सवरून स्वस्तात वस्तू देण्याच्या आमिषाने एका व्यक्तीला सुमारे सव्वासात लाख रुपयांना गंडा घातल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे. सलमान मोहम्मद इसरार शेख आणि मोहसीन अहमद जावेद खान अशी या दोघांची नावे आहेत. त्यांच्या अटकेने फसवणुकीच्या अशाच काही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. यातील तक्रारदार सांताक्रुझ परिसरात राहतात.

लॉकडाऊनमध्ये ओएलएक्सवर स्वस्तात इलेक्ट्रॉनिक वस्तूची सेल आहे. त्यामुळे जास्तीत जास्त वस्तू खरेदी करून चांगला फायदा मिळावा असे आमिष त्यांना दाखविण्यात आले होते. या आमिषाला बळी पडून त्यांनी गेल्या वर्षी जुलै आणि ऑगस्ट महिन्यांत नऊ टिव्ही, तीन वॉशिंग मशिन, पाच होम थिएटर, दोन कॅमेरा, पाच मोबाईल, अ‍ॅपल वॉच, दहा लॅपटॉप, आयपॅड, मॅक प्रो. बुक साऊंड बार खरेदी करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी या दोघांनी त्यांच्या खात्यातून ७ लाख २२ हजार ६१० रुपये घेतले. मात्र त्यांना स्वस्तात संबंधित वस्तू दिल्या नाही. या आरोपींकडून आपली फसवणूक झाल्याचे निदर्शनास येताच त्यांनी वर्सोवा पोलीस ठाण्यात संबंधित आरोपीविरुद्ध तक्रार केली होती.

- Advertisement -

याप्रकरणी फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंद होताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक सिराज इनामदार, पोलीस निरीक्षक संजय पवार, पोलीस उपनिरीक्षक गणपत धायगुडे, भंडारे, रकटे, थोरात, अवघडे, दळवी यांनी आरोपींचा शोध सुरू केला होता. ही शोधमोहीम सुरू असताना अंधेरीतील वेस्टर्न एक्सप्रेस हायवे, रुस्तमजी इमारत परिसरातून सलमान आणि मोहसीन या दोघांना पोलिसांनी अटक केली. ते दोघेही अंधेरी परिसरात राहत असून त्यांनीच हा गुन्हा केल्याची कबुली दिली. या दोघांनी मुंबईसह इतर शहरात काही गुन्हे केल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. सध्या ते दोघेही पोलीस कोठडीत असून त्यांची पोलिसांकडून कसून चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.


हेही वाचा – ‘प्रपोज डे’ला मैत्रिणीकडून नकार, दुख: पचवू न शकल्याने प्रियकारने संपवले आयुष्य

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -