घरक्राइमबाय वन थाली अँड गेट २ थाली फ्रिची ऑफर आणि ९९ हजारांचा...

बाय वन थाली अँड गेट २ थाली फ्रिची ऑफर आणि ९९ हजारांचा गंडा

Subscribe

बाय वन थाली अँड गेट २ थाली फ्री,ऑन युअर फर्स्ट ऑर्डर…Book now Call Only अशी ऑफर तुम्हालाही फेसबुकवर आलीय का? आली असेल तर जरा थांबा नाहीतर तुमची लाखो रुपयांची फसवणूक होईल. औरंगाबादमध्ये Buy one get 2 Thali Free अशी जाहीरात दाखवून भामट्यांनी फेसबुकवरुन लाख रुपयांची फसवणूक केली आहे.

औरंगाबाद येथे राहणाऱ्या बाळासाहेब ठोंबरे हे फेसबुकवर स्क्रोल करत असताना त्यांना फेसबुकवर शाही भोजन थाळी Buy one get 2 Thali Free, Book now Call Onlyअशी जाहिरात दिसली. ३०० रुपयात शाही भोजन थाळी त्यातही दोन थाळ्या फ्री म्हटल्यावर बाळासाहेब जाहीरातीला भुलले आणि त्यांनी फेसबुकवर दिलेल्या नंबर कॉल केला. बाळासाहेबांनी फोन केला पण थाळीची बुकींग फक्त ऑनलाइन होईल असं त्यांना सांगण्यात आलं. बाळासाहेबांनी विश्वास ठेवला आणि क्रेडीट कार्डची सगळी माहिती समोरच्या माणसाला देऊन टाकली. सगळे डिटेल्स दिल्यानंतर मोबाईलवर एक ओटीपी आला आणि तो ओटीपी समोरच्या व्यक्तीने मागितला.

- Advertisement -

ऑनलाइन भामट्याने आता इथवर न थांबता पहिली बुकींग झालीच नाही असं सांगितलं आणि दुसऱ्यांदा बुकींग करायला सांगितलंआणि ३०० रुपयांच्या थाळीच्या बदल्यात तब्बल ९९ हजार ८९० रुपये वसूल केले. दुसरीकडे भूकेने व्याकूळ झालेले बाळासाहेब जेवणाची थाळी अजून कशी आली म्हणून विचार करत बसले होते. तेवढ्यात फोनवर ९९ हजार रुपये खात्यातून गेले असल्याचा मेसेज आला आणि बाळासाहेबांची भूकच सोडा त्याच्या तोंडच पाणीच पळालं.

आपली फसवणूक झाल्याचा या सगळा प्रकार लक्षात आल्यानंतर बाळासाहेब ठोंबरे यांनी सायबर पोलिसात तक्रार केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भोज थाळीच्या मालकाला काही दिवसांपूर्वी पोलिसांनी अटक केली होती त्यानंतर त्याला सोडण्यात देखील आलं मात्र तो पुन्हा एकदा आपल्या टोळीसह सक्रीय झालाय.

- Advertisement -

जे बाळासाहेब थोरात यांच्या बाबतीत झालं ते तुमच्या बाबतीत होऊ नये असं तुम्हाला वाटत असेल तर फेसबुक किंवा सोशल मीडियावरुन कोणत्याही जाहिराती पाहून ऑर्डर देताना शंभर वेळा विचार करा. ऑफर आधी कोणत्या हॉटेल किंवा रेस्टॉरंटची आहे ते आधी चेक करा. नाहीतर तुम्हाला ३०० रुपयांसाठी ९९ हजारांची फसवणूक होईल.


हेही वाचा – भिवंडीतून ४० बांग्लादेशी घुसखोरांना अटक; बनावट पासपोर्ट, आधारकार्डसह ९४ हजारांचा मुद्देमाल जप्त

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -