Monday, September 20, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी Ganesh Chaturthi 2021 : बाल गणेश साकारणाऱ्या अवलियाकडे २०२३ पर्यंत ऑर्डर फुल्ल

Ganesh Chaturthi 2021 : बाल गणेश साकारणाऱ्या अवलियाकडे २०२३ पर्यंत ऑर्डर फुल्ल

अंबानींनाही नाकारली होती मूर्ती

Related Story

- Advertisement -

बाल गणेश रूपातली बाप्पाची मूर्ती घडवणाऱ्या मुंबईतील विशाल शिंदे हे गेल्या दहा वर्षांपासून गणपतीच्या मूर्ती तयार करत आहेत. बाल गणेश मूर्ती बनवण्याचा एक आगळा वेगळा विक्रम विशाल शिंदेंच्या नावावर आहे. त्यांच्या बाल गणेश रूपातल्या मूर्त्या इतक्या प्रसिद्ध आहेत की येत्या २०२३ पर्यंत त्यांच्याकडे गणेश मूर्तीच्या ऑर्डर फुल्ल आहेत. मातीच्या विविध आकारातील मूर्त्या तयार करण्याची कला त्यांनी गेल्या दहा वर्षात अत्यंत मनोभावे जोपासली आहे. गणेश मूर्ती तयार करण्यात त्यांनी एक प्रकारची क्रांतीच आणली आहे. छोट्या देखण्या अशा रूपातल्या गणेश मूर्ती तयार करण्याची जादू त्यांच्या हातांनी घडवली आहे.

Bal ganesh

चाळीतून थेट स्टुडिओत

- Advertisement -

गणेशाच्या वेगवेगळ्या रूपातल्या मूर्त्यांमध्येच रमणाऱ्या विशाल शिंदेंचे विश्वच गणेशमूर्त्या आहेत. वेगवेगळ्या रंगातून आणि आकारातून गणेशाच्या मूर्त्या अक्षरशः बोलतात अशी कला आतापर्यंत त्यांनी गणेशमूर्तीच्या माध्यमातून साकारली आहे. ना तहान लागत ना भूख लागत सगळ विसरून या कलेच्या मागे झपाटल्यासारख्या मूर्त्या त्यांनी बनवल्या आहेत. आपल्या वडिलांपासून या गणेशमूर्ती तयार करण्याचा वारसा मिळाल्याचे ते सांगतात. लालबागमध्ये लहापण गेले. पण वडिलांनी लालबागमधील एकाहून एक अशा गणेशमूर्तीकारांची कला अवगत केली होती. विशाल शिंदेंनी हीच कला पुढे बाल गणेशाच्या रूपाने जोपासली. या कलेची व्याप्ती इतकी झाली की त्यांना आता आपल्या कलेसाठी स्टुडिओ तयार करावा लागला. वयाच्या १६ व्या वर्षापासून ते मूर्ती तयार करत आहेत. जे जे स्कूल ऑफ आर्ट्समधून शिक्षण पूर्ण केले. पण कौटुंबिक व्यवसायात न अडकता काही तरी वेगळे करण्याच्या उद्देशानेच त्यांनी मूर्ती शिल्प क्षेत्रातील शिक्षण पुर्ण केले.

Bal ganesh

- Advertisement -

शाडूच्या मातीपासून मूर्त्या तयार करतानाच चांगल्या रंगसंगतीसाठी विशाल शिंदे यांची कला ओळखली जाते. सुरूवातीच्या काळात लालबागच्या चाळीतूनच कामाला सुरूवात केल्यानंतर आता लोअर परळ यथे ए टू झेड इंडस्ट्रियल इस्टेटच्या माध्यमातून त्यांनी एक स्टुडिओतून आपला व्यवसाय सांभाळला आहे. पुढच्या वर्षी पासून रंगाची विक्रीही सुरू करणार असल्याचे विशाल शिंदे सांगतात.

Bal ganesh

कलेशी तडजोड नाहीच

गणेश मूर्त्यांवर काम करणारे अनेक कलाकार आहेत. पण बाल गणेश हे विशाल शिंदे यांच्या कलाकृतीचे वैशिष्ट्य आहे. बाल स्वरूपातील मूर्तीसोबत गजमुख, रंगसंगती, स्किन टोन, फिनिशिंगच्या मूर्त्या हे मूर्तीचे मुख्य वैशिष्ट्य. अतिशय इमानदारीने, कामासाठीच्या प्रेमातून आणि मनोभावे अशी कला आतापर्यंत साकारल्याचे समाधान असल्याचे ते सांगतात. एकप्रकारे माझे जीवनच गणेशमूर्त्या, माती आणि रंग झाल्याचा त्यांचा अनुभव आहे. प्रत्येत वेगवेगळ्या कलाकृतीतून गणेशमूर्ती घडवण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न असतो जो भक्तांनाही भावतो असेही त्यांनी सांगितले. लोकांनी आजवर फक्त कलेवर प्रेम केले आहे. त्यामुळे खूपशी मार्केटिंग करण्याची वेळ आली नाही. खूपसा पैसा कमवण्याचा उद्देश या कलेतून नाही. त्यामुळे गुणवत्तेशी कोणतीही तडजोड न करता काम करण्याचा उद्देश असतो. अनेकदा ग्राहकांपेक्षा कलेच्या दृष्टीने काय योग्य आहे, यासाठीचा निर्णय घ्यावा लागतो. त्यावेळी गणेशाच्या भक्तीचा भाव महत्वाचा असतो. अनेकदा मूर्तीमध्ये परफेक्शन येत नाही तोवर काम करण्याचा ध्यास असतो. त्यामध्ये सोंड किती असावी, शाल किती ठेवायची, मुकुट किती असावा, कोणती रंगसंगती असावी अशा सगळ्या गोष्टींचा विचार करतो. परफेक्शनशी कोणतीही तडजोड करत नसल्याचे ते सांगतात.

Bal ganesh

 

२०२३ पर्यंत ऑर्डर फुल्ल 

विशाल शिंदेंच्या मूर्तीची किंमत ही २ हजारांपासून ते १८ हजारांपर्यंत आहे. माती आणि फायबर अशा दोन्ही प्रकारच्या मूर्त्या ते साकारतात. शाडूच्या मूर्तींची किंमत ही १२ हजारांपासून ते १८ हजार इतकी आहे. पण किंमतीपेक्षा मूर्त्यांसाठी दिला जाणारा वेळ हा अतिशय किंमती असल्याचे ते मानतात. साधारणपणे एक मूर्ती तयार करण्यासाठी चार दिवस लागतात. गणेश चतुर्थीच्या निमित्ताने अनेकदा खूपच ऑर्डर असतात. त्यामुळे अनेकदा एडव्हान्स ऑर्डर घ्याव्या लागतात. इतर वेळी मात्र वेगळ्या गणेश मूर्त्यांसाठी ते काम करतात. येत्या २०२३ पर्यंत माझ्याकडे गणेश मूर्तींची ऑर्डर फुल्ल आहे.

Bal ganesh

आज कोणताही ग्राहक मूर्ती खरेदीसाठी आला तर मला गणेश मूर्ती देता येणार नाही. कारण माझ्याकडे दोन वर्षांपर्यंतच्या ऑर्डर आहेत. अंबानी परिवारातील एक कर्मचारी मूर्ती घेण्यासाठी आमच्याकडे आला होता. पण त्यांनाही आम्ही ऑर्डर फुल्ल असल्याने मनाई केली. अनेक व्हीव्हीआयपी येतात, पण आम्ही आमच्या नियमांशी तडजोड करत नाही असेही विशाल सांगतो. एका सिझनला आमच्याकडे २७० ते ३०० मूर्त्या तयार होतात. संपुर्ण वर्षभर इतक्या मूर्त्यांच्या ऑर्डरचे काम संपत नाही. पण आम्ही एरव्ही दसरा ते डिसेंबर अखेरीपर्यंत ऑर्डर घेतो. येत्या २ वर्षांच्या ऑर्डर आमच्याकडे सध्या आहेत. त्यामुळे आयत्यावेळी कोणतेही काम आम्ही घेत नसल्याचे ते सांगतात.


 

Bal ganesh


हेही वाचा – ganesh chaturthi 2021 : बेकरी व्यावसायिकाने साकारला इको फ्रेंडली चॉकलेट बाप्पा, पाहण्यासाठी भाविकांची गर्दी


 

- Advertisement -