Wednesday, April 14, 2021
27 C
Mumbai
घर क्राइम पुणे हादरलं! नराधमांकडून मुलीवर बलात्कारानंतर गोळीबार, पण मोबाईलने वाचला जीव

पुणे हादरलं! नराधमांकडून मुलीवर बलात्कारानंतर गोळीबार, पण मोबाईलने वाचला जीव

तरुणीवर सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

Related Story

- Advertisement -

देशात महिला, तरुणींवर होणाऱ्या बलात्कारांच्या घटनानमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. नुकत्याच एका घटनेमुळे पुणे हादरुन गेले आहे. पुण्यात एका तरुणीवर सामूहिक बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेनंतर नराधमांनी तिच्या छातीवर गोळी झाडली. मात्र, त्या तरुणीने मोबाईल छातीजवळ ठेवल्याने यातून ती बचावली असून त्यात पीडिती जखमी झाली आहे. या घटनेतील दोन आरोपींना अटक करण्यात आली असून सध्या तीन आरोपींचा शोध सुरु आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसर हादरुन गेला आहे.

नेमके काय घडले?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी तिच्या मैत्रिणीसोबत एका मित्राच्या वाढदिवसाला वारजे माळवाडी येथे गेली होती. वाढदिवस झाल्यानंतर तिला तीन मुलांनी खोलीत नेले आणि तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर ती तेथून निघाली. मात्र, घटनास्थळावरुन निघूनही तिचा त्या तरुणांनी पिछा सोडला नाही. तिला पुन्हा अडवण्यात आले आणि ‘अजून दोघे जण येणार आहेत तू थांब, असे सांगण्यात आले. तसेच तू येथून निघालीस तर तुला मारुन टाकू, अशी धमकी देखील देण्यात आली. त्याचप्रमाणे या घटनेबाबत कोणालाही सांगायचे नाही’, असे देखील बजावण्यात आले. मात्र, तरुणीने थांबण्यास नकार दिला. त्यानंतर एका आरोपीने पोटमाळ्यावर असलेली पिस्तूल काढली आणि तिच्या छातीवर गोळी झाडली. पण, पीडितीने मोबाईल छातीजवळ ठेवल्याने तिचा जीव थोडक्यात बचावला. परंतु, या घटनेमध्ये तरुणी जखमी झाली आहे. या तरुणीवर उपचार केल्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले.

- Advertisement -

या तरुणीने आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला असून याप्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. हडपसर येथे राहणाऱ्या २४ वर्षीय कृष्णा ऊर्फ रोहन ओव्हाळ आणि वारजे माळवाडीतील २० वर्षीय निरंजन ऊर्फ निलेश शिंदे या दोघांना अटक करण्यात आली आहे. तर तीन जणांचा सध्या शोध सुरु आहे.


हेही वाचा – दुर्दैवी! मशिदीचा खांब कोसळून निष्पाप मुलांचा मृत्यू


- Advertisement -

 

- Advertisement -