घरक्राइमगँगस्टर सुरेश पुजारीला फिलिपाईन्स मध्ये अटक?

गँगस्टर सुरेश पुजारीला फिलिपाईन्स मध्ये अटक?

Subscribe

२००७ मध्ये भारताबाहेर आपल्या प्रेयसीला घेऊन निसटला होता

गँगस्टर सुरेश पुजारीला (Gangster Suresh Pujari)  फिलिपाईन्स मध्ये अटक करण्यात आली आहे. अमेरिकेच्या फेडरल ब्युरो ऑफ इन्वेस्टीगेशन आणि डिपार्टमेंट ऑफ जुरीडिक्शन यांनी केलेल्या संयुक्त कारवाईत प्रेयसीसोबत लपून बसलेल्या सुरेश पुजारीला अटक करण्यात आली आहे. सुरेश पुजारी याच्या अटके बाबत मुंबई पोलिसांकडून अद्याप दुजोरा देण्यात आलेला नाही. सुरेश पुजारी हा गँगस्टर २००७ मध्ये भारताबाहेर आपल्या प्रेयसीला घेऊन निसटला होता. परदेशात राहणारा सुरेश पुजारी याला २०२० मध्ये फिलिपाईन्स मध्ये प्रेयसीसोबत दडून बसल्याची माहिती मुंबई पोलिसांना यापूर्वीच गुप्त माहिती दाराने दिली होती. मात्र त्याचा नेमका ठाव ठिकाणा मिळून येत नव्हता.
अमेरिकेच्या एफबीआय आणि डिपार्टमेंट ऑफ ज्यूरिडिक्शन यांनी नुकतीच केलेल्या कारवाईत सुरेश पुजारी याला फिलिपाईन्स मधून अटक केली असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. याबाबत मात्र मुंबई पोलिसांकडून अद्याप अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नाही. सुरेश पुजारी याच्यावर एकट्या मुंबईत १६ गंभीर गुन्ह्याची नोंद असून मुंबई पोलिसांनी १५ पेक्षा अधिक सुरेश पुजारी टोळीच्या गुंडांना अटक केली आहे. ठाणे पोलीस आयुक्त यांच्या हद्दीत देखील पुजारी याच्यावर अनेक गुन्हे दाखल असून काही महिन्यांपूर्वी त्याने उल्हासनगर येथील एका बांधकाम व्यवसायिकाला धमकवाल्याचा गुन्हा दाखल झाला होता.
सुरेश पुजारी हा परदेशात बसून आंतरराष्ट्रीय कॉल मार्फत मुंबई सह ठाण्यातील बडे व्यापारी, बिल्डर, व्यवसायिक यांना खंडणीसाठी धमकावत असे. सुरेश पुजारी स्वतः साधा फोन वापरत होता व बँक व्यवहारासाठी स्मार्ट फोनचा वापर करीत होता. सीबीआय ने त्याला रेड कॉर्नर नोटीस देखील बजावली होती. सुरेश पुजारी याला भारतात आणण्याच्या हालचाली सुरू झाल्या असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -