Gangster Suresh Pujari: सुरेश पुजारीची १४ दिवसांसाठी पोलीस कोठडीत रवानगी

Gangster Suresh Pujari remanded in police custody for 14 days
Gangster Suresh Pujari: सुरेश पुजारीची १४ दिवसांसाठी पोलीस कोठडीत रवानगी

कोनगाव येथे झालेल्या हॉटेल्स वरील गोळीबार प्रकरणी कुख्यात गुंड असलेल्या सुरेश पुजारी याला ठाणे खंडणी विरोधी पथकाने बुधवारी ठाणे विशेष मोक्का न्यायालयात हजर केले. यावेळी न्यायालयाने सुरेश पुजारीला १४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील पोलीस ठाण्यात सुरेश पुजारी त्याच्या विरोधात दाखल असलेल्या विविध गुन्ह्यांप्रकरणी मंगळवारी रात्री त्याचा ताबा मुंबई पोलिसांकडून ठाणे शहर पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाने घेतला. बुधवारी, पुजारीला कोनगाव येथील एका हॉटेलवर केलेल्या गोळीबार आणि त्यामध्ये एका कर्मचाऱ्याला जखमी केल्याप्रकरणी ठाणे विशेष मोक्का न्यायालयाचे न्यायाधीश व्ही वाय जाधव यांच्या न्यायालयात हजर केले. त्यावेळी न्यायालयाने पुजारीला १४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. यावेळी सरकारी वकील म्हणून संजय मोरे यांनी काम पाहिले. तर याप्रकरणाचा तपास सहायक पोलीस आयुक्त अशोक रजपूत हे करत आहेत.

कुठे होता सुरेश पुजारी?

२०१६ पासून सुरेश पुजारी फिलिपिन्समध्ये राहत होता. परंतु भारतीय पासपोर्ट २०१९ मध्ये संपुष्टात आला होता. त्यामुळे मंबईतील दोन विविध न्यायालयाद्वारे सुरेश पुजारीविरोधात वॉरंट जारी करण्यात आला होता. पुजारा हा मूळचा उल्हासनगर येथे राहणारा आहे. पुजारी आपलं नाव बदलून सुरेश पुरी आणि सतीश पई या नावानेही राहत होता.

रवी पुजारीने २००२ मध्ये अॅडव्होकेट माजिद मेमन यांच्यावर हल्ला केला होता. त्यानंतर २००६ मध्ये बॉलिवूड इंडस्ट्रीमधले चित्रपट निर्माते महेश भट यांच्या घराबाहेर गोळीबार केला होता. तसेच सर्वात महत्त्वाचं म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री जितेंद्र आव्हाड यांना धमकी सुद्धा दिली होती. त्यानंतर त्याच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले होते. परंतु मुंबई पोलिसांकडून अटक करण्याआधीच तो भारतातून फरार झाला होता.

मुंबई, नवी मुंबई आणि ठाण्यातील डान्स बार मालकांना खंडणीसाठी तो फोन करायचा. २०१८ मध्ये सुरेश पुजारीच्या शूटर्सने कल्याण भिवंडी हायवे येथील एका हॉटेलला निशाणा करत अंदाधुंद गोळीबार केला होता.


हेही वाचा – समीर वानखेडे यांची ठाण्यात आठ तास चौकशी, कोपरी पोलीस ठाण्यात झाले वकिलांसह हजर