घरक्राइमधक्कादायक! लग्नाआधी सेक्स करणे पडले महागात, प्रेयसीचा मृत्यू तर प्रियकर गंभीर जखमी

धक्कादायक! लग्नाआधी सेक्स करणे पडले महागात, प्रेयसीचा मृत्यू तर प्रियकर गंभीर जखमी

Subscribe

आजच्या काळाच सेक्स सारख्या विषयावर उघडपणे बोलले जात असताना इंडोनेशियासारख्या देशात लग्नाआधी सेक्स केल्याने शिक्षा भोगावी लागत आहे

लग्नाआधी प्रेम करणे, एकत्र फिरणे ते लग्नाआधी सेक्स करणे ही आता फारच कॉमन आणि कॅज्युअल गोष्ट झाली आहे. आज अनेक प्रियकर प्रेयसी लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहतात. सेक्स सारख्या विषयावर आज भारतातही  खुलेपणाने बोलले जाते. मात्र इंडोनेशियात एका प्रेम युगुलाला लग्नाआधी सेक्स करणे प्रचंड महागात पडले आहे. लग्नाआधी सेक्स केल्याने प्रेयसीचा मृत्यू झाला. तर प्रियकर गंभीर जखमी झाला आहे. आजच्या काळाच सेक्स सारख्या विषयावर उघडपणे बोलले जात असताना इंडोनेशियासारख्या देशात लग्नाआधी सेक्स केल्याने शिक्षा भोगावी लागत आहे. ही घटना आहे आहे इंडोनेशियामधील ल्होकसेउमावे (Lhokseumawe) येथील. लग्नाआधी शारीरिक संबंध ठेवल्यामुळे या प्रेमी युगुलाला १००-१०० फटक्यांची शिक्षा सुनावण्यात आली. या भयंकर शिक्षेत प्रेयसीचा जागीच मृत्यू झाला. तर तिचा प्रियकर गंभीररित्या जखमी झाला आहे. (girlfriend death due to Physical relation before marriage, boyfriend seriously injured in Indonesia)

इंडोनेशियात शरीया कायद्याची दहशत

आज जगातील अनेक देश प्रगती करत असताना इंडोनेशिया सारखा देश शरीया कायद्याची तीव्र दहशतीखाली आहे. ल्होकसेउमावे हे शहर इंडोनेशियातील सर्वात पुराणमतवादी शहर म्हणून ओळखले जाते. या देशात शरीया कायद्याच्या अंतर्गत लग्नाआधी शारीरिक संबंध ठेवल्यास त्यांच्यावर लैंगिक संबंध केल्याच्या आरोपाखाली १००-१०० फटके मारण्याची शिक्षा सुनावण्यात येते. त्याचप्रमाणे दारु पिणे, व्यभिचार करणे आणि लग्नापूर्वी सेक्स करणे किंवा समलैंगिक संबंध ठेवल्यास या कायद्यातंर्गत शिक्षा सुनावण्यात येते. इंडोनेशियातील या प्रेमी युगुलाने लग्नाआधी सेक्स केल्याने त्यांना सार्वजनिक ठिकाणी १०० -१०० फटके मारण्यात आले आणि या भयंकर शिक्षेत प्रेयसीला तिचा जीव गमवावा लागला.

- Advertisement -

इंडोनेशियातील या धक्कादायक घटनेनंतर आंतरराष्ट्रीय मानव अधिकार संघटनेने या कायद्यातंर्गत होणाऱ्या शिक्षेचा तीव्र निषेध करून हा कायदा रद्द करण्याची मागणी केली आहे. सार्वजनिक ठिकाणी फटके मारण्याऐवजी आरोपींना तुरुगांत पाठवण्यात यावे अशी मागणी याआधी करण्यात आली होती. मात्र त्या मागणीची पुढे काहीच होऊ शकले नाही.


हेही वाचा – पुण्यात नवविवाहित डॉक्टर दाम्पत्यांची आत्महत्या, पत्नी नंतर पतीनेही घेतला गळफास

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -