घरAssembly Battle 2022Goa Assembly Election Results 2022 : गोव्यात सत्तास्थापनेचा मॅजिक फिगर कसा गाठणार...

Goa Assembly Election Results 2022 : गोव्यात सत्तास्थापनेचा मॅजिक फिगर कसा गाठणार ? प्रमोद सावंत यांचा खुलासा

Subscribe

गोवा विधानसभा निवडणुकीच्या ४० जागांपैकी २५ जागांचे निकाल हे निवडणूक आयोगाकडून जाहीर झाले आहेत. भाजपने मताधिक्याच्या जवळचा आकडा गाठण्याचा प्रवास सुरू केला आहे. त्याआधीच भाजपला तीन अपक्षांचा पाठिंबा असल्याचा दावा पक्षाकडून करण्यात येत आहे. गोव्यातील विधानसभा निवडणुकीच्या निकालामध्ये तीन अपक्षांना विजय मिळवता आला आहे. तर भाजपच्या १४ उमेदवारांचा विजय झाला आहे. एकुण २० जागांवर भाजप आघाडीवर आहे. तुलनेत कॉंग्रेसचे ११ ठिकाणी उमेदवार आघाडीवर असून अवघ्या ५ कॉंग्रेसचा भाजपचा विजय झाला आहे. गोव्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री पदाचे उमेदवार प्रमोद सावंत यांनीही गोव्यातील अपक्ष उमेदवारांचा पाठिंबा असल्याचा दावा केला आहे.

निकालानंतर प्रमोद सावंत यांचे पहिल ट्विट 

डॉ प्रमोद सावंत यांनी गोव्यातील यशानंतर गोवेकर जनतेचे आभार मानले आहेत. गोव्याच्या जनतेने विश्वास आणि प्रेम दाखवल्यासाठी त्यांनी भावना व्यक्त केल्या आहेत. भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवल्यासाठीही त्यांनी गोवेकर जनतेचे आभार मानले आहेत.

- Advertisement -

बहुमताचा मॅजिक फिगर

गोव्यातील पक्षांमध्ये रिव्होल्यूशनरी गोअन्स पार्टी, गोवा फॉरवर्ड पार्टी यासारख्या पक्षांचा एक उमेदवार विजयी झाला आहे. तर आम आदमी पक्षाचा एक उमेदवार विजयी झाला आहे. गोव्यात बहुमतासाठी भाजपला २१ जागांची गरज आहे. गोव्यात तीन अपक्ष आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा भाजपचा आहे. तर याआधीच गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनीही अपक्ष तसेच महाराष्ट्रवादी गोमांतक पक्षाचा पाठिंबा असल्याचे जाहीर केले होते.

- Advertisement -

गोवा निवडणुकीच्या निकालामध्ये सध्या आपचा १ उमेदवार, भाजपचे ६ उमेदवार, कॉंग्रेसचे ६ उमेदवार, महाराष्ट्रवादी गोमंतक २ ठिकाणी आघाडीवर आहे. पण अद्यापही या जागांचे निकाल हाती आलेले नाहीत. त्यामुळेच या निकालानंतरच संपूर्ण चित्र स्पष्ट होईल.

गोव्यात याआधी त्रिशंकु अवस्था निर्माण होईल, असे चित्र मांडले जात होते. भाजपनेही त्या अनुषंगानेच मोर्चेबांधणीला सुरूवात केली होती. तर कॉंग्रेसने दुसरीकडे आमदार हॉटेलवर आणत २०१७ चा धोका टाळण्याचा प्रयत्न केला होता. कॉंग्रेसला या निवडणुकीत मोठी अपेक्षा होती. पण भाजपच्या कामगिरीपुढे मात्र एकुणच कॉंग्रेसला यंदा गेल्या निवडणुकीच्या यशाच्या तुलनेत बॅकफुटला जावे लागले असेच चित्र दिसले.


Goa Assembly election results 2022 : थोड्या मतांनी, पण जिंकलो, गोव्यात सत्तास्थापनेचा दावा करणार – प्रमोद सावंत

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -