डोंबिवली स्टेशन जवळील इमारतीला भीषण आग, आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमनदलाच्या जवानांना यश

सुदैवाने आगीत कोणताही जिवितहानी नाही

godown fire in lakshmi nivas building near Dombivali station 3 fire brigade reached the spot
डोंबिवली स्टेशन जवळ इमारतीला भीषण आग, अग्निशमन दलाच्या ३ गाड्या घटनास्थळी

डोंबिवली स्थानकाच्या बाहेर भीषण आग लागली आहे. डोंबिवली स्टेशन जवळील जुन्या लक्ष्मी निवास इमारतीला दुसऱ्या मजल्यावर्ती एका गोडाऊनला ही आग लागली आहे. (godown fire in lakshmi nivas building near Dombivali station ) आग इतकी भीषण होती की आगीमुळे परिसरात काळ्या धुराचे लोट वाहू लागले. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या ३ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. (3 fire brigade reached the spot)  अग्निशम दलाच्या जवानांच्या शर्थीच्या प्रयत्नांमुळे ही आग आटोक्यात आणण्यात अग्निशनदलाच्या जवानांना यश आले आहे. (fire brigade managed to control the fire in dombivali)  जवळपास एका तासात अग्निशमनदलाच्या जवानांनी या आगीवर नियंत्रण मिळवले. सुदैवाने या आगीत कोणताही जिवितहानी झालेली नाही. या गोडाऊनला ही आग कशी लागली? हे अद्याप समजू शकलेले नाही.

डोंबिवली पूर्व रेल्वे स्टेशनजवळ लक्ष्मी निवास नावाची एक जुनी इमारत आहे. या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर लाकडाचे गोदाम होते. या गोदामाला ही आग लागली. दुपारी ३ ते ३:३० वाजताच्या सुमारास ही भीषण आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. या भीषण आगीमुळे संपूर्ण परिसरात धुराचे लोट पसरले आहेत. आगीमुळे लाकडाचे गोदाम जळून खाक झाले आहे. या इमारतीत नागरिक देखील राहत होते. त्यामुळे आग लागल्यानंतर इमारतीतील नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली होती. मात्र कोणतीही जिवित हानी झाली नसल्याचे समोर येत आहे.


हेही वाचा – ठाण्यात इलेक्ट्रॉनिक्स मार्केटमध्ये भीषण अग्नितांडव; सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही