Saturday, February 27, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी Live Update: समीर खानचा जामीन अर्ज फेटाळला

Live Update: समीर खानचा जामीन अर्ज फेटाळला

Related Story

- Advertisement -

राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांचे जावई समीर खानचा मुंबई सेशल कोर्टाने जामीन अर्ज फेटाळला. ड्रग्ज कनेक्शन प्रकरणात समीर खानविरोधात सक्षम पुरावे असल्यामुळे जामीन अर्ज फेटाळण्यात आला.


गुंड गजानन मारणे पुण्यातून पुन्हा एकदा फरार झाला आहे. गजा मारणे फरार झाल्याची पुणे पोलिसांनी दिली आहे. त्याला शोधण्यासाठी पोलिसांनी त्याच्या सर्व अड्ड्यांवर धाडी घातल्या आहे. पोलिसांची टिम फरार गजाचा शोध घेत आहे.


- Advertisement -

संजय राठोड २३ फेब्रुवारीला पोहरादेवीत येणार आहेत. पूजा राठोड आत्महत्या प्रकरणात संजय राठोड आपली भूमिका मांडणार का याकडे सर्वांचे लक्ष आहे. वाशिम पोहरादेवीत आज दुपारी ४ वाजता महंतांची बैठक पार पडली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.


संजय राठोड यांच्याबाबत पोहरादेवी येथे आज दुपारी ४ वाजचा महंतांची महत्त्वाची बैठक होणार आहे. वनमंत्री संजय राठोड यांच्याबाबतीत पोहरादेवी धर्मपीठ निर्णय घेण्याची शक्यता आहे. मंगळवारी संजय राठोड पोहरादेवी ठिकाणी येतील असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.


- Advertisement -

पंतप्रधानांची निती आयोगाची दिल्ली येथे बैठक सुरु झाली आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ते देशातील सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधत आहेत.


पेट्रोल आणि डिझेलच्या दराने शंभरी पार केली आहे. सलग १२व्या दिवशी पेट्रोल डिझेलच्या किंमतीत वाढ झाली आहे. पेट्रोल ३७ पैसे तर डिझेल ३९ पैशांनी महागले. वाढलेल्या इंधनांच्या किंमतींनी ग्राहक संतापले आहेत.


गेल्या काही महिन्यांपासून वाढलेले सोन्याचे दर आता कमी होऊ लागले आहे. ५१ हजारांवर पोहचलेल्या सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. सोन्याचे दर प्रतितोळा ४६ हजाराच्या घरात. गेल्या ८ महिन्यांमध्ये सोन्याच्या दरातील ही मोठी घसरण आहे. लग्न सराईच्या तोंडावर सोन्याच्या दरात घसरण झाल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.

- Advertisement -