Gold Price Today: सोने खरेदी झाली स्वस्त ; ४८ हजारांहून कमी किमतीत मिळतंय सोनं

gold silver price today mcx mumbai pune gold 180 and silver 300 hike
Gold-Silver Price Today : सोन्याचा दर १८० रूपये तर चांदी १३० रुपयांनी महागली, जाणून घ्या आजचे दर

भागवत एकादशीपासून म्हणजे १४ नोव्हेंबर २०२१ पासून लग्नसराईच्या शुभ मुहूर्तांना सुरुवात होणार आहे. दिवाळीनंतर तुळशीचे लग्न झाले की,लग्नाची सनई वाजायला सुरुवात होते. या लग्नसराईत तुम्हाला सोने-चांदी खरेदी करायची असेल तर तुमच्यासाठी ही एक उत्तम संधी आहे. सोन्याच्या किमतीत घसरण सुरूच आहे. मात्र, आज सोन्या-चांदीच्या दरात किंचित वाढ झाली आहे. आज, बुधवारी मल्टी-कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोन्याचा भाव ०.३८ टक्क्यांनी वाढून ४७,६१६ रुपये प्रति १० ग्रॅम आहे. गेल्या मंगळवारच्या ४९,३४० रुपयांच्या किमतीपेक्षा ही किंमत सुमारे २,००० रुपये कमी आहे, ही दिलासादायक बाब आहे.त्याचबरोबर आज चांदीच्या दरात किंचित वाढ झाली आहे. चांदीचा भाव ०.४३ टक्क्यांनी वाढून ६२,७७७ रुपये प्रति किलो झाला.

सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी सरकारने एक अॅप बनवले आहे. ‘बीआयएस केअर अॅप’द्वारे ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. या अॅपद्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धता तपासू शकत नाही, तर त्यासंबंधी कोणतीही तक्रारही करू शकता.याव्यतिरिक्त तुम्ही ऑफिशिअल वेबसाईट www.ibja.co किंवा ibjarates.com वर भेट देऊ शकता.तसेच, ८९५५६६४४३३ या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सोन्याचे लेटेस्ट रेट्स चेक करु शकता. जेव्हा तुम्ही या नंबरवर मिस्ड कॉल द्याल, त्यावेळी तुमच्या मोबाईलवर एसएमएस येईल.


हे ही वाचा : Corona: कोरोना चाचण्या वाढवा! केंद्रीय आरोग्य सचिवांचे महाराष्ट्रासह १३ राज्यांना पत्र