घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रकारागिराला सापडल्या सोन्याच्या अंगठ्या, त्यानंतर जे घडलं त्यावर कोणी विश्वास नाही ठेवणार

कारागिराला सापडल्या सोन्याच्या अंगठ्या, त्यानंतर जे घडलं त्यावर कोणी विश्वास नाही ठेवणार

Subscribe

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमुळे अवघ्या १० मिनिटांत मिळाल्या दोन अंगठ्या

भररस्त्यात एखाद्याला सोन्याचे दागिने सापडले तर अनेकजण ते गपचुप स्वत:कडे ठेवतात. विशेष म्हणजे, सराफ बाजारात दागिने सापडतील, या आशेने अनेकजण या परिसरात फेरफटकाही मारत असतात. मात्र, सराफांकडे सोने घडवणार्‍या एका कारागिराने प्रामाणिकपणे भररस्त्यात सापडलेल्या सोन्याच्या दोन अंगठ्या सराफ असोसिएशनच्या माजी अध्यक्षांकडे सुपूर्द केल्या. माजी अध्यक्षांनीही घटनेचे गांभीर्य ओळखून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपच्या मदतीने अवघ्या १० मिनिटांत संबंधित ज्वेलर्सला दिल्या. या कारागिराचा गुरुवारी (दि.२३) नाशिक सराफ असोसिएशनच्या पदाधिकार्‍यांनी विशेष सन्मान केला.

नाशिकरोडचे नीलेश जडे यांना बुधवारी (दि. २१) सराफ बाजारातील सरस्वती चौकात दोन सोन्याच्या अंगठ्या सापडल्या होत्या. त्या अंगठ्यांची किंमत ४० हजार रुपये आहे. सराफ व्यवसायिकांकडे सोने घडविण्याचे काम करत असल्याने त्यांना सोन्याचे मुल्य आणि सोने जपून ठेवण्यासाठी अनेकजण विविध धडपड करत असल्याची माहिती होती. त्यांनी तत्काळ सराफ असोसिएशनचे माजी अध्यक्ष चेतन राजापूरकर यांच्याशी संपर्क साधला. त्यांना राजापूरकर यांना रस्त्यात दोन सोन्याच्या अंगठ्या सापडल्याचे सांगितले. ही माहिती मिळताच सामाजिक कार्यात सदैव पुढाकार घेणारे चेतन राजापूर यांनी सराफ व्यावसायिकांच्या व्हॉटसअ‍ॅप ग्रुपवर पोस्ट अपलोड केली. त्यानंतर अवघ्या १० मिनिटात अंगठ्या कोणाच्या आहेत, ते समजले. त्या अंगठ्या बेदमुथा ज्वेलर्सच्या असल्याची खात्री झाली. बेदमुथा यांच्याशी संपर्क साधत त्यांना त्या अंगठ्या परत करण्यात आल्या.

- Advertisement -

दुसर्‍या दिवशी गुरुवारी (दि. २२) नीलेश जडे यांनी दाखवलेल्या प्रामाणिकपणाची दखल घेत सराफ असोसिएशनच्या वतीने जडे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी अध्यक्ष गिरीश नवसे, माजी अध्यक्ष चेतन राजापूरकर, सेक्रेटरी किशोर वडनेरे, सुनील महालकर, पवन महालकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

पोस्ट आली उपयोगी

कारागिर नीलेश जडे यांनी सोन्याच्या दोन अंगठ्या सापडल्यानंतर तत्काळ संबंधित व्यक्तीला त्या परत मिळाव्यात, यासाठी प्रयत्न केले. त्यासाठी व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर पोस्ट अपडेट केली. त्यामध्ये कोणत्या ठिकाणी, किती वाजता अंगठ्या सापडल्या, याचा उल्लेख केला. त्यामुळे त्या अंगठ्या बेदमुथा ज्वेलर्सच्या असल्याचे समजले. त्यांना सन्मानपूर्वक परत केल्या आहेत.

- Advertisement -

चेतन राजापूरकर, माजी अध्यक्ष, सराफ असोसिएशन, नाशिक

Sushant Kirve
Sushant Kirvehttps://www.mymahanagar.com/author/ksushant/
गेल्या १२ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. क्राईम, आरोग्य, साहित्य, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर लिखाण. शहरातील वाहतुकीला शिस्त लागावी आणि जीवघेण्या अपघातांमध्ये घट होण्यासाठी सातत्याने लेखन.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -