घरताज्या घडामोडीपर्यटकांसाठी खूशखबर : सिलेंडरचे दर वाढले तरी अलिबागमध्ये हॉटेल व्यवसाय महागणार नाही

पर्यटकांसाठी खूशखबर : सिलेंडरचे दर वाढले तरी अलिबागमध्ये हॉटेल व्यवसाय महागणार नाही

Subscribe

पर्यटकांनो अलिबागमध्ये पर्यटनाला या,हॉटेलमध्ये पार्ट्या झोडा, खाऊन-पिऊन मजा करा...

पेट्रोल-डिझेलची दरवाढ सुरु असतानाच घरगुती आणि व्यावसायिक सिलेंडरची दरवाढही होत आहे. व्यावसायिक सिलेंडरत तब्बल ४३ रुपयांनी महाग झाला आहे. सर्वच किमती वाढत असल्या तरी सध्या हॉटेलिंगचे दर वाढवण्याच्या मनस्थितीमध्ये हॉटेल व्यावसायिक नसल्याचे दिसून येते. त्यामुळे हॉटेलमध्ये जाऊन पार्ट्या झोडा, खाऊन-पिऊन मजा करण्याची संधी खवय्यांना चालुन आली आहे.

कोरोनाच्या कालावधीत लॉकडाऊनमध्ये सर्वच व्यवहारांवर निर्बंध आले होते. त्यामुळे अर्थकारणाला चांगलाच ब्रेक लागला होता. हॉटेल व्यावसायिकांनाही त्याचा चांगलाच फटका बसला आहे. अर्थचक्राला गती येत असतानाच आता व्यावसायिक सिलेंडरचे दर वाढले आहेत.त्यामुळे हॉटेलिंग महाग होणार अशी चिंता खवय्यांना लागली होती. आता कोठे पर्यटन सुरु झाले आहे. त्या निमित्ताने ग्राहक खाण्या-पिण्यासाठी बाहेर पडत आहेत. त्यात पदार्थाचे दर वाढवले तर व्यवसायावर विपरीत परिणाम होऊ शकतो. त्यामुळे दर वाढवण्याच्या मनस्थितीमध्ये हॉटेल व्यावसायिक नसल्याचे दिसून येते.

- Advertisement -

सिलेंडरने महागाईत तेल ओतले

गेल्या काही दिवसांमध्ये सिलेंडरचे दर सातत्याने वाढत आहेत. घरगुती सिलेंडरसह व्यावसायिक सिलेंडरची दर वाढी झाली आहे. सध्या ४३ रुपयांनी व्यावसायिक सिलेंडरची दरवाढ झाली आहे. त्यामुळे महागाईचा चांगलाच भडका उडाला आहे.

सिलेंडरची दर वाढ झाली आहे हे खरे आहे. आता कोठे जिल्ह्यात पर्यटनाला बहर येत आहे. त्यानिमीत्ताने पर्यटक खाण्या-पिण्यासाठी बाहेर पडत आहे. त्यातच आता पदार्थांची दर वाढ केली तर व्यवसायाला धक्का बसू शकतो. दर तीन वर्षांनी आम्ही दरवाढ करतोच. म्हणूनच सध्या कोणतीही दरवाढ करण्यात येणार नाही.

- Advertisement -

– यशवंत हरेर, हॉटेल व्यावसायिक

कोरोना लॉकडाऊनमध्ये हॉटेल व्यवसाय बंद होता. नागरिक घराबाहेर पडत नव्हते. आता कोरानाचा प्रभाव कमी झालेला आहे. त्यामुळे पर्यटनाला सुरुवात झाली आहे. स्थानिकांसह पर्यटकही हॉटेलमध्ये येत आहेत. दरवाढ केली तर व्यवसायावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे सध्या तरी कोणतीच दर वाढ करण्यात येणार नाही.

– अजित म्हात्रे, हॉटेल व्यावसायिक

महिना व्यावसायिक सिलेंडर घरगुती सिंलेडर

जानेवारी   1326  705
फेब्रुवारी   1497  850
मार्च       1592   830
एप्रिल     1622   820
मे         1576    820
जून       1454   820
जुलै       1536.50    845.50
ऑगस्ट    1530        870.50
सप्टेंबर     1679        895.50
ऑक्टोबर  1715       895.50


हे ही वाचा – Petrol Diesel Price Today: पेट्रोल-डिझेलच्या दरात ‘इतकी’ झाली वाढ, जाणून घ्या नवे दर


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -