घरताज्या घडामोडीसीमाभागातील मराठी बांधवांच्या लढ्याला सरकारचा संपूर्ण पाठिंबा

सीमाभागातील मराठी बांधवांच्या लढ्याला सरकारचा संपूर्ण पाठिंबा

Subscribe

सीमाभागातील मराठी भाषिक बांधवांच्या लढ्याला राज्यातील महाविकास आघाडी सरकारचा संपूर्ण पाठिंबा आहे. बेळगाव, कारवार, निपाणीसह ‘संयुक्त महाराष्ट्र’ हा आपला निर्धार आहे. बेळगावसह सीमाभागातील मराठी बांधव महाराष्ट्रात सामील होण्यासाठी देत असलेल्या लढ्याला महाराष्ट्रातील प्रत्येकाचा सक्रिय पाठिंबा असल्याचे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी ठामपणे सांगितले.

सीमाभागातील मराठी बांधवांच्या संघर्षाला मी देखील जाहीर पाठिंबा व्यक्त करतो. हा लढा आपल्या सर्वांचा आहे. मराठी भाषिक सीमाभाग महाराष्ट्रात सामील झाल्याशिवाय हा संग्राम थांबणार नाही, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला आहे.

- Advertisement -

गेल्या अनेक दिवसांपासून सीमाभागातील मराठी बांधवांचा लढा सुरू आहे. महाराष्ट्रातील जनता तसेच महाराष्ट्र सरकार सीमाभागातील नागरिकांच्या पाठीशी भक्कमपणे उभा असल्याची ग्वाही अजित पवार यांनी दिली. कर्नाटकरात मराठी बांधवांवर होणारा अन्याय, अत्याचाराचा निषेध मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात आला. या पार्श्वभूमीवर मुंबईत राष्ट्रवादीचे नेते आणि कार्यकर्त्यांनी काळ्या फिती बांधून कर्नाटक सरकारचा निषेध नोंदवला.

तो भाग महाराष्ट्रात येईल- जयंत पाटील
आमचा मराठी माणसाचा सीमाभाग लवकरच महाराष्ट्रात सामील होईल, अशी खात्री राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केली आहे. राज्यातील जनता सीमा भागातील मराठी भाषिक लोकांच्या मागे पूर्ण ताकदीने उभी आहे. सर्वोच्च न्यायालयात प्रकरण प्रलंबित असले तरी कर्नाटकमधील मराठी बांधवांवरील अन्याय थांबलेला नाही. राष्ट्रवादी काँग्रेस त्याचा निषेध नोंदवत असल्याचे जयंत पाटील म्हणाले.

- Advertisement -

कर्नाटकला जोरदार प्रत्युत्तर
‘बेळगाव हा कर्नाटकचा अविभाज्य भाग आहे. सूर्य, चंद्र असेपर्यंत तो महाराष्ट्राला कधीही मिळणार नाही, अशी दर्पोक्ती कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी केली आहे. सवदी यांच्या या वक्तव्याचा ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. चंद्र, सूर्य कशाला?, तुमचा उपमुख्यमंत्रिपदाचा कार्यकाळ संपण्यापूर्वी बेळगाव महाराष्ट्रात असेल, असे जोरदार प्रत्युत्तर हसन मुश्रीफ यांनी लक्ष्मण सवदींना दिले आहे.

संजय राऊत यांचा टोला
शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही लक्ष्मण सवदी यांना प्रत्युत्तर दिले आहे. ‘सूर्य-चंद्र तर राहतीलच, आम्हाला इतरांकडून ज्ञान घेण्याची गरज नाही, त्यांनी त्यांचं पाहावं’, असा टोला राऊतांनी सवदी यांना लगावला. बेळगावातील सीमाप्रश्न सध्या सर्वोच्च न्यायालयात आहे, असेही संजय राऊत म्हणाले.

लवकरच महाराष्ट्रात याल एकनाथ शिंदेंचे शिवसैनिकांना आश्वासन 
बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकीसह संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीसाठी गेली 62 वर्षे सीमावासीयांना लढा सुरू आहे. या लढाच्या पार्श्वभूमीवर रविवारी 1 नोव्हेंबरला मराठी भाषिकांकडून काळा दिवस पाळला जातो. याच पार्श्वभूमीवर शिवसेना नेते मंत्री एकनाथ शिंदे यांनी बेळगावातील शिवसैनिकांशी फोनवरून संवाद साधला. यावेळी बेळगावसह सीमाभाग लवकरच महाराष्ट्रात येईल, अशा शब्दात त्यांनी शिवसैनिकांना आश्वस्त केले.

काँग्रेसच्या मंत्र्यांनी काळ्या फिती बांधल्याच नाही
कर्नाटकात १ नोव्हेंबर हा राज्योत्सव दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी महाराष्ट्र एकीकरण समितीकडून, मराठी भाषिक प्रदेश कर्नाटकात नेल्याच्या निषेधार्थ काळा दिन पाळते. मात्र, यावर्षी कर्नाटक सरकारने एकीकरण समितीला परवानगी नाकरली आहे. त्यामुळे सीमाभागातील मराठी भाषिकांना पाठिंबा दर्शवण्यासाठी महाविकास आघाडी सरकारच्या सर्व मंत्र्यांनी १ नोव्हेंबरला काळ्या फिती बांधून कामकाज केले. मात्र, काँग्रेस त्यापासून लांब राहिल्याचे पहायला मिळाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -