Sunday, September 19, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी लोक न्यायालयाला लोकांचा मोठा प्रतिसाद

लोक न्यायालयाला लोकांचा मोठा प्रतिसाद

जास्तीत जास्त तंटे सामोपचाराने मिटवण्यासाठी लोक न्यायालयांचा उपक्रम फायदेशीर ठरत असल्याचे गेल्या काही वर्षांतल्या लोक न्यायालयांच्या अनुभवांवरून समोर आले आहे.

Related Story

- Advertisement -
महाराष्ट्र राज्य विधि सेवा प्राधिकरण मुंबई यांच्या निर्देशानुसार रायगड जिल्ह्य़ातील सर्व तालुका, कौटुंबिक, कामगार, सहकार आणि इतर न्यायालयांमध्ये  रविवार दिनांक १ ऑगस्ट  रोजी राष्ट्रीय लोक अदालत भरवण्यात आली आहे.
जिल्हा व सत्र न्यायालयाचे प्रमुख  वि.प्र.इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळपासून या लोक न्यायालयलाचे कामकाज चालू आहे. विविध प्रकारची प्रकरणे तडजोडीसाठी येथे ठेवण्यात आली असून, सर्व पक्षकारांनी या अदालतमध्ये सहभागी होऊन संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार दिंनाक १ ऑगस्ट रोजी लोक अदालत भरण्यात आले आहे. ज्या लोकांना न्यायालयात हजर होता आले नाही, त्यांच्यासाठी ऑनलाईन लोक न्यायालयाची सोय करण्यात आली .
जास्तीत जास्त तंटे सामोपचाराने मिटवण्यासाठी लोक न्यायालयांचा उपक्रम फायदेशीर ठरत असल्याचे गेल्या काही वर्षांतल्या लोक न्यायालयांच्या अनुभवांवरून समोर आले आहे. त्यामुळे लोक न्यायालये आयोजित करून तंटे सामोपचाराने मिटवण्यासाठी दरवर्षी राष्ट्रीय लोक न्यायालयांचे आयोजन केले जाते. उभय पक्ष यात सहभागी होऊन तडजोडनामा सादर करत तंटे मिटवतात.
महाराष्ट्र राज्य विधि सेवा प्राधिकरण मुंबई यांच्या निर्देशानुसार रायगड जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या न्यायालयांमध्ये या लोकन्यायालयांचे आयोजन केले गेले आहे. यात दिवाणी स्वरूपाची, फौजदारी स्वरूपाची तडजोडीस पात्र, वैवाहिक स्वरूपाची, १३८ एन. आय. अ‍ॅक्ट अन्वये दाखल झालेली प्रकरणे, बँक वसुलीची प्रकरणे, मोटर अपघात नुकसानभरपाई, कौटुंबिक वाद, कामगारविषयक तंटे, भूसंपादन प्रकरणे, वीज व पाणीविषयक देयक प्रकरणे, महसूल आणि दाखल पूर्व प्रकरणे या लोक न्यायालयात तडजोडीसाठी ठेवली जाणार आहेत. त्यामुळे उभय परांनी या संधीचा फायदा घेऊन जास्तीत जास्त प्रकरणे लोकन्यायालयात दाखल केली आहेत. मागील लोकन्यायालय १२ डिसेंबर २०२० रोजी झाले होते त्या वेळेस जास्तीत जास्त प्रकरणे तडजोड करून निकाली काढण्यात रायगड जिल्हा हा महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर होते.

हेही वाचा – धमकी देऊ नका…एक झापड दिली, तर पुन्हा उठणार नाही; मुख्यमंत्र्यांचा सूचक इशारा


- Advertisement -