घरताज्या घडामोडीपिल्लांसाठी दिले आईने बलिदान !

पिल्लांसाठी दिले आईने बलिदान !

Subscribe

सात पिल्लांचे रक्षण करताना कुत्री बिबट्याच्या भक्ष्यस्थळी, ठाण्याच्या मानपाडा भागात बिबट्याच्या वावराने दहशत

ठाण्याच्या मानपाडा भागात बिबट्याच्या वाढत्या वावरामुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले असून बिबट्याने भटक्या कुत्रीची शिकार केल्याच्या वृत्ताने ठाण्यात खळबळ उडवून दिली आहे. आपल्या सात पिल्लांचे संरक्षण करताना कुत्री बिबट्याच्या भक्षस्थळी पडल्याची जोरदार चर्चा परिसरात सुरू आहे. कुत्रीची सातही पिल्ले सुखरूप असून बिबट्याचा आणि कुत्रीच्या अवशेषांचा शोधकार्य वन विभागाकडून सुरू असल्याची माहिती ठाणे महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले आहे.

ठाण्यातील घोडबंदर रोडवरील पातलीपाडा या ठिकाणी असलेल्या तबेल्याजवळ महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळाचे पॉवर हाऊस आहे. या पॉवर हाऊसजवळ एका भटक्या कुत्रीने सात पिल्लांना जन्म दिला होता. या कुत्रीची आणि तिच्या पिल्लांची देखरेख करणारा येथील सुरक्षा रक्षकाला रविवारी रात्री कुत्रीची सातही पिल्ले दिसून आली. मात्र, या पिल्लांची आई कुठेच दिसून आली नसल्यामुळे सुरक्षा रक्षकाने तिचा शोध घेतला. परंतु ती कुठेच मिळून न आल्यामुळे दुसर्‍या दिवशी सकाळी सुरक्षा रक्षकाने पुन्हा शोध घेतला तरी तिचा कुठेही थांगपत्ता लागला नाही.

- Advertisement -

मात्र, कुत्र्याच्या पिल्लांजवळ बिबट्याचे पायाचे ठसे सुरक्षा रक्षकाला दिसून आल्यामुळे कुत्री बिबट्याच्या भक्ष्यस्थळी पडल्याची खात्री होताच सुरक्षा रक्षकाने वन विभागाकडे तक्रार केली. दरम्यान, वनविभागाने पातळीपाडा तसेच संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाला लागून असलेला संपूर्ण परिसर पिंजून काढला. मात्र, कुत्रीचे अवशेष अद्याप कुठेही मिळून आले नसल्याची माहिती वनाधिकारी नरेंद्र मुठे यांनी ‘आपलं महानगर’शी बोलताना दिली.

ठाण्याच्या पातलीपाड्यात बिबट्याचा वावर वाढला. त्यानेच कुत्रीच्या पिल्लांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला आणि आपल्या पिल्लांचे रक्षण करताना कुत्री बिबट्याच्या भक्ष्यस्थळी पडल्याची जोरदार चर्चा पातलीपाडा परिसरात सुरू आहे. कुत्रीची सातही पिल्ले सुखरूप असून कुत्रीच्या अवशेषांचा आणि बिबट्याचा शोध घेण्याचे प्रयत्न युद्ध पातळीवर सुरू असल्याची माहिती वनविभागाने दिली आहे. पातलीपाडा हा परिसर संजय गांधी राष्ट्रीय उद्यानजवळ येत असल्यामुळे या ठिकाणी वन्यप्राण्याचा वावर सुरू असण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच

- Advertisement -

हावरे सिटी येथील अनेक नागरिकांनी बिबट्याला या परिसरात वावरताना बघितले असल्याच्या अनेक तक्रारी वनविभागाकडे असल्याचे वनाधिकारी नरेंद्र मुठे यांनी सांगितले.

ठाण्यातील घोडबंदर रोड, मानपाडा परिसरात अनेक वेळा येथील नागरिकांना तसेच दुकानदाराना बिबट्याचे दर्शन झाल्यामुळे सोमवारी घडलेली घटना तेवढीच खरी असून बिबट्यानेच कुत्रीची शिकार केली असावी, असे स्थानिकांचे म्हणणे आहे. दरम्यान, वनविभागाकडून मंगळवारी रात्री देखील उशिरा बिबट्या आणि कुत्रीच्या अवशेषांचा शोध घेण्यात येत होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -