घरक्राइमबॉडी बनवण्याच्या नावाखाली जिम ट्रेनरने दिले ड्रग्ज!

बॉडी बनवण्याच्या नावाखाली जिम ट्रेनरने दिले ड्रग्ज!

Subscribe

या ड्रग्ज प्रकरणी पोलिसांनी सात आरोपींना अटक केली असून यामध्ये दोन महिलांचा समावेश आहे.

काही जिम ट्रेनर बॉडी बनवण्याचा नावाखाली ड्रग्ज देत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. एवढेच नव्हे  तर हे सर्व तरुण-तरुणींना बार, कॅफे आणि पबमध्ये देखील ड्रग्जचे व्यसन लावून त्यांच्याकडून मोठी रक्कम वसूल करत होते, अशी माहिती एएनआयच्या वृत्तानुसार समोर आली आहे. ही घटना इंदौरमध्ये घडली आहे. याप्रकरणी आता इंदौरच्या विजय नगर पोलिसांनी ड्रग्ज पेडलर्सना ताब्यात घेतले आहेत. तसेच पोलिसांनी सात आरोपींना अटक केली असून यामध्ये दोन महिलांचा समावेश आहे. आरोपींकडून ४० ग्रॅम एमडीएमए (MDMA) ड्रग्ज जप्त केले आहे.

या आरोपींच्या चौकशी दरम्यान जिम ड्रेनर बॉडी बनवण्याचा नावाखाली ड्रग्ज देत असल्याचे समोर आले आहे. दरम्यान इंदौर शहरात सातत्याने ड्रग्ज संबंधित संघटनातील आरोपींना ताब्यात घेतले जात आहे. यादरम्यान विजय नगर पोलिसांनी अजून एका ड्रग्ज टोळीचा पर्दाफाश केला आहे. हे आरोपी जिम, कॅफे, पब आणि बारमध्ये तरुण-तरुणींना एमडीएमए ड्रग्ज सातत्याने विकत होते.

- Advertisement -

या ड्रग्ज टोळीचा पर्दाफाश करणाऱ्या टीमला आयजी योगेश देशमुख यांच्याद्वारे बक्षीस देण्याची घोषणा केली आहे. दरम्यान याप्रकरणी आणखीन आरोपींना अटक करण्याची शक्यता आहे. आता अटक करण्यात आलेल्या आरोपींच्या साथीदारांना यापूर्वी अटक करण्यात आली होती. या आरोपींच्या चौकशीत मिळालेल्या माहितीनुसार या ड्रग्ज नेटवर्कपर्यंत पोहोचण्यासाठी एक टीम तयार करण्यात आली आणि त्यानंतर या ड्रग्ज प्रकरणातील मुख्य आरोपीला ताब्यात घेतले.


हेही वाचा – धक्कादायक! दारूचा ग्लास सांडला म्हणून डोंबिवलीत एकाची हत्या!

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -