कब्र खोदून मृतदेहाच्या डोक्यावरून केस चोरी करणारे पाच जण गजाआड

hair stolen from corpse of women by digging the grave
कब्र खोदून मृतदेहाच्या डोक्यावरून केस चोरी करणारे पाच जण गजाआड

गुजरातमध्ये भरूच जिल्ह्यात एक हैरान करणारी घटना समोर आली आहे. कब्र खोदून महिलांच्या मृतदेहातून केस चोरण्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी पाच जणांचा अटक केली असून यामध्ये दोन जण अल्पवयीन आहेत. पोलिसांचा याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.

आरोपी मुलं रात्रीच्या वेळी कब्र खोदत होते, ज्यामध्ये महिलांचा मृतदेह दफन केला जात असेल. हे कब्र खोदल्यानंतर ते महिलांच्या मृतदेहातून केस चोरी करत असे. याप्रकरणी पोलिसांनी दोन अल्पवयीन मुलांसहित तीन जणांचा अटक केलं आहे. पोलिसांनी सांगितले की, ‘आरोपी महिलांचा मृतदेह असलेले कब्र शोधायचे. आरोपींची त्या कब्रावर करडी नजर असायची. कोणत्याही महिलेचा शव दफन केल्यानंतर जोपर्यंत मृतदेहापासून केसाची चमडी वेगळी होत नाही तोपर्यंत ते वाट पाहत असे. त्यानंतर रात्रीच्या वेळी कब्र खोदून मृतदेहापासून केस उखडून काढायचे. मग ते कापून घ्यायचे. दरम्यान या आरोपी मुलांना पडले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले.

पोलिसांच्या चौकशीत आरोपींनी सांगितले की, ‘नुकतेच त्यांनी ईखर गावाच्या कब्रिस्तानमध्ये एक कब्राचे नुकसान केले आहे.’ दरम्यान केस खूप महागड्या किंमतीत विकले जात असल्यामुळे हे आरोपी महिलेच्या मृतदेहाचे केस चोरी करत होते. एका महिलेचे ८० ते १२५ ग्रॅमपर्यंत केस मिळत होते. या केसांना खूप मागणी होती. माहितीनुसार, हे केस ६ ते ७ हजार रुपये किलो ग्रॅम विकले जात होते. या केसांचा विग बनवण्यासाठी केला जात होता.


हेही वाचा – महिलेने रस्त्यावर कचरा टाकला, पालिकेने तोच कचरा उचलून तिच्या घरात टाकला!