Monday, September 27, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी hartalika teej 2021: हरतालिका व्रत महिला का करतात? या दिवशी पार्वती देवीला...

hartalika teej 2021: हरतालिका व्रत महिला का करतात? या दिवशी पार्वती देवीला काय अर्पण केले जाते?

Related Story

- Advertisement -

आज ९ सप्टेंबर, भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाची तृतीया आहे, याला हरतालिका तीज (हरतालिका व्रत) म्हटले जाते. या दिवशी महिला आपल्या जोडीदारासाठी चांगले आरोग्य, दीर्घायुष्य, सुखी जीवन आणि यशासाठी व्रत करतात. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार हरतालिकाच्या व्रता दिवशी देवी पार्वतीसोबत गणपती, भगवान शंकर, कार्तिकेय स्वामी यांची विशेष पूजा केली पाहिजे.

व्रत केल्यामुळे महिलांच्या समस्या होतात दूर

प्राचीन काळात देवी पार्वतीने भगवान शंकर पती व्हावे म्हणून हरतालिकेचे व्रत केले होते. पार्वती यांनी केलेले व्रत आणि तप यांच्या प्रभावामुळे भगवान शंकत प्रसन्न झाले. यानंतर भगवान शंकर आणि पार्वती यांचा विवाह झाला. हरतालिकेचे व्रत करणाऱ्या महिला देवी पार्वतीच्या कथा ऐकतात. कथेत देवी पार्वतीचा त्याग, संयम, धैर्य आणि पतिव्रता याचा महिमा सांगितला आहे. ही कथा ऐकल्यानंतर महिलांचे पुण्य, मनोबल वाढवते आणि त्यांच्या समस्या दूर होतात.

- Advertisement -

प्रजापती दक्षाची कन्या सतीने भगवान शंकराच्या अपमानाने दुःखी होऊन तिच्या वडिलांच्या यज्ञकुंडात उडी मारली आणि प्राण त्याग केला. त्यानंतर देवीने मैना आणि हिमावानची मुलगीच्या रुपात अवतार घेतला. देवी पार्वतीने भगवान शंकर पती होण्यासाठी व्रत करून कठोर तप केला. यामुळे भगवान शंकर प्रसन्न झाले आणि पार्वती यांना पत्नी म्हणू स्वीकारण्याचे वरदान दिले. त्यानंतर हिमावान आणि मैना यांनी शंकर-पार्वती यांचे लग्न लावून दिले.

या दिवशी हे शुभ काम केले जाते

काही महिला हे व्रत पाण्याविना राहून करतात. व्रताच्या दुसऱ्या दिवशी सकाळी स्नान केल्यानंतर पूजा केली जाते. पूजा केल्यानंतर महिला अन्न आणि पाणी घेतात. या व्रतामध्ये महिला एखाद्या शंकराच्या मंदिरात शिवलिंगाच्या समोर बसून गणपती, शंकर आणि देवी पार्वतीची पूजा करतात. पूजेमध्ये देवी मंत्राचा १०८ वेळा जप केला पाहिजे.

- Advertisement -

मंत्र – गौरी मे प्रीयतां नित्यं अघनाशाय मंगला। सौभाग्यायास्तु ललिता भवानी सर्वसिद्धये।।

देवी पार्वतीला हे अर्पण करा

देवी पार्वतीला लाल बांगड्या, लाल चुनरी, कुंकू इत्यादी गोष्टी अर्पण कराव्यात. तसेच काही गोष्टी दान केल्या पाहिजेत. या दिवशी घरात भगवान शंकर, देवी पार्वती, कार्तिकेय स्वामी आणि गणपतीची पूजा केली पाहिजे. तसेच घरातील मंदिर फुलांनी सजवा. एका केळीच्या पानांवर शंकर, पार्वती आणि गणपतीच्या मूर्ती किंवा छायाचित्र ठेवा. मग त्यांची पूजा करा. देवीला सौभाग्याचे लेणे अर्पण करा.

गर्भवती महिलांनी व्रत करताना काळजी घ्या

ज्या महिला गर्भवती आहेत, त्यांनी व्रत करताना सावध राहा. खाण्या-पिण्याची खास काळजी घ्या. भुकेले राहणे समस्या वाढवू शकते. अशा परिस्थितीत गर्भवती महिलांनी आरोग्याची काळजी घ्या आणि मग व्रत करा.


हेही वाचा – Ganesh Chaturthi Guidelines 2021 : यंदाही गणपतीबाप्पाचे मंडपात दर्शन नाही! राज्य सरकारची नवी नियमावली जारी


- Advertisement -