घरताज्या घडामोडीपेणमध्ये परतीच्या पावसामुळे कापणीची कामे ठप्प

पेणमध्ये परतीच्या पावसामुळे कापणीची कामे ठप्प

Subscribe

निसर्गाच्या या खेळाला शेतकरी पुरता कंटाळला आहे.

भाताचे कोठार समजल्या जाणार्‍या या तालुक्यात परतीच्या पावसाचे धूमशान सुरू असल्याने शेतातील भात पीक कापणी ठप्प झाल आहे. तालुक्यात १० हजार ५०० हेक्टरवर भाताचे पीक घेतले जाते. जवळपास ८० टक्के शेतकर्‍यांचे भात हेच मुख्य पीक आहे. यावर्षी अतिवृष्टीमुळे सुरुवातीला भातशेतीचे नुकसान झाले असताना शेतकर्‍याने न डगमगता आपल्या काळ्या मातीमध्ये सोन्यासारखे पीक घेतले आहे. मात्र ऑक्टोबर महिन्यात विजांच्या कडकडाटात, जोरदार वार्‍यासह पाऊस पडत असल्याने तयार झालेली शेतातील रोपे आडवी पडत आहेत. मेहनत घेऊन तयार केलेले पीक पावसाच्या अतिरेकामुळे वाया जाताना पहावे लागते की काय, याची चिंता शेतकर्‍यांना लागली आहेत.

सध्या शेतात साचलेले पाणी काढण्यासाठी शेतकरी विविध प्रकारची शक्कल लढवत आहे. मात्र भाताची कणसे आलेली रोपे शेताता आडवी पडल्याने त्यांना मोड येऊ लागले आहेत. यंदा निसर्गाच्या या खेळाला शेतकरी पुरता कंटाळला असून, या झालेल्या सर्व नुकसानीचे पंचनामे करून भरपाई मिळावी, अशी मागणी तो करीत आहे. भातशेतीची कापणी केली तर येणार्‍या पावसामुळे भाताचे पीक भिजण्याची शक्यता आहे आणि जर भातशेती कापली नाही तर शेतातील उभे पीक शेतामध्ये कोलमडून गेल्याने कुजण्याची शक्यता आहे. त्यामुळे ‘धरलं तर चावतंय आणि सोडलं तर पळतंय’ अशी काहीशी परिस्थिती आहे.

- Advertisement -

भाताची कापणी केल्यानंतर साधारणपणे चार ते पाच दिवसांत बांधणी करावी लागते. परंतु परतीचा पाऊस जोरदार पडत असल्याने शेतकरी कापणी करू शकत नसल्याने भाताची रोपे शेतात आडवी पडून नुकसान होणार आहे.
-कमलाकर म्हात्रे, शेतकरी


हे ही वाचा – जयपूरच्या फेअरमोंट हॉटेलवर आयकरचे छापे; महाराष्ट्रातील ‘या’ राजकीय नेत्याशी कनेक्शन

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -