सुशील कुमारच्या अकॅडमीवर गोळीबार; कुस्तीपटू निशा दहियासह भावाचा मृत्यू, आई गंभीर जखमी

haryana crime national level wrestler nisha dahiya shot dead family attack in sonipat sushil kumar academy
सुशील कुमारच्या अकॅडमीवर गोळीबार; कुस्तीपटू निशा दहियासह भावाचा मृत्यू, आई गंभीर जखमी

काही अज्ञात हल्लेखोरांनी कुस्तीपटू सुशील कुमार नावाच्या अकॅडमीवर अंधाधुंद गोळीबार केल्याचे समोर आले आहे. या गोळीबारात राष्ट्रीय स्तरावरील कुस्तीपटू निशा दहियासह भावाचा मृत्यू झाला आहे. तसेच तिची आई गंभीर जखमी झाली असून तिला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अचानक गोळीबारामुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. हरयाणातील सोनीपतच्या हलालपूर गावात ही खळबळजनक घटना घडली आहे. महत्त्वाचे म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आजच निशाचे कौतुक केले होते.

हल्लेखोर झाले फरार 

आजतकच्या वृत्तानुसार, हलालपूरच्या कुस्तीपटू सुशील कुमार नावाच्या अकॅडमीवर हल्लेखोरांनी अंधाधुंद गोळीबार केला. यात कुस्तीपटू निशा दहिया आणि तिच्या भावाचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर आई गंभीर जखमी झाली. या गोळीबाराच्या आवाजाने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली. हा गोळीबार झाल्यानंतर अज्ञात हल्लेखोर घटनास्थळावरून फरार झाले. निशाची आई धनपति यांना रोहतक पीजीआयमध्ये दाखल केले आहे. अजूनही त्यांची प्रकृती नाजूक आहे. अद्याप गोळीबारामागचे नेमके कारण अस्पष्ट आहे.

सोनीपत पोलिसांनी निशा आणि तिचा भाऊ सूरज या दोघांचा मृतदेह ताब्यात घेतला असून पोस्टमॉर्टममध्ये सिव्हिल रुग्णालयात पाठवले आहे. या हायप्रोफाईल दुहेर हत्याकांडमधील तपास आता खरखोदा पोलीस ठाण्याने सुरू केला आहे. फरार झालेल्या अज्ञात हल्लेखोरांचा शोध घेतला जात आहे. या घटनेनंतर परिसरातील लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.


हेही वाचा – कार भाड्याने देणे पडलं महागात! पुण्यात ३०० कारमालकांची फसवणूक