घरताज्या घडामोडीआरोपीकडून शेंगदाण्यांसाठी लाच मागणारा कॉन्स्टेबल निलंबित!

आरोपीकडून शेंगदाण्यांसाठी लाच मागणारा कॉन्स्टेबल निलंबित!

Subscribe

उत्तर प्रदेशमध्ये फतेहपूरच्या पोलीस कर्मचाऱ्याने लाच म्हणून शेंगदाणे खरेदी करण्यासाठी ५० रुपयांची मागणी केल्याने त्याला निलंबित करण्यात आले आहे.

लाचखोर कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी वरचेवर विशेष प्रयत्न केले जातात. मात्र, याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतेच आहे. असाच एक प्रकार उत्तर प्रदेशमध्ये पाहयला मिळाला. उत्तर प्रदेशमध्ये फतेहपूरच्या एका हेड कॉन्स्टेबलला लाच म्हणून शेंगदाणे खरेदी करण्यासाठी ५० रुपयांची मागणी केल्याने पोलीस अधीक्षकांनी निलंबित केले आहे. या संपूर्ण घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यानंतर आरोपी हेड कॉन्स्टेबल अशोक कुमार सिंह यांना निलंबित करण्यात आले आहे.

शेंगदाणे खरेदी करण्यासाठी ५० रूपयांची लाच

काही दिवसांपूर्वी खखेररू पोलीस ठाण्याचे प्रमुख हेड कॉन्स्टेबल अशोक कुमार सिंह पैसे घेत असल्याचं दिसून आलं होतं. एका सोनाराला कोर्टात हजर करण्यासाठी गेले असता त्या ऐवजी त्यांनी पैशांची मागणी केल्याचं समोर आलं होतं. यादरम्यान सोनाराने कोर्टात येण्यास नकार दिल्यानंतर पोलीस कर्मचाऱ्याने लाच म्हणून शेंगदाणे खरेदी करण्यासाठी ५० रूपयांची मागणी केली. त्या व्यक्तीने देखील ती ५० रुपयांची लाच दिल्याचं समोर आलं होतं.

- Advertisement -

चुकीचे काम करणाऱ्या कोणालाही सोडले जाणार नाही

याबाबत सादर करण्यात आलेल्या पुराव्यांची दखल घेत पोलीस आयुक्तांनी हेड कॉन्स्टेबलला सोमवारी पोलीस स्टेशनच्या प्रमुखांकडून तपासणीचा अहवाल मिळाल्यानंतर तातडीने निलंबित केले आहे. तसेच पोलीस अधिक्षक प्रशांत वर्मा यांनी व्हायरल व्हिडिओच्या आधारे निलंबन करताना सांगितले की, “लाच एक हजार रुपये असो की एक रुपयाची असो” चुकीचे काम करणाऱ्या कोणालाही सोडले जाणार नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -