सामाजिक बांधिलकी मदतफेरीतून पुरग्रस्तांना मदत

कोकणातील पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी ठाण्याचे आमदार संजय केळकर व भाजप ठाणे जिल्हाध्यक्ष आमदार निरंजन डावखरे यांच्या नेतृत्वाखाली कोपरी येथे मदतफेरीचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते.

Helping the flood victims through social commitment relief rounds

अतिवृष्टीमुळे कोकणसह पश्चिम महाराष्ट्रात हाहाकार  उडाला असुन अनेक गावे उध्वस्त झाली.या आपत्तीग्रस्तांसाठी अनेक हात सरसावले असून ठाणे पुर्वेकडील कोपरीवासियांनीही सामाजिक बांधिलकी जपत कोकणवासियांना मदतीचा हात दिला आहे. कोपरीतील भाजप नगरसेवक भरत चव्हाण व युवा मोर्चाचे सचिव ओमकार चव्हाण यांनी मदतफेरीच्या माध्यमातुन मदतीचा सेतू उभारला आहे.

कोकणातील पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी ठाण्याचे आमदार संजय केळकर व भाजप ठाणे जिल्हाध्यक्ष आमदार निरंजन डावखरे यांच्या नेतृत्वाखाली कोपरी येथे मदतफेरीचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते. यावेळी ठाणे महापालिकेचे नगरसेवक भरत चव्हाण, ओमकार चव्हाण यांनी संपूर्ण कोपरी प्रभागात फिरून ज्या नागरिकांना मदत करण्याची इच्छा होती, त्यांच्यामार्फत मदत संकलन केली.

केरळ असो वा पश्चिम महाराष्ट्र असो कोपरीकर नेहमीच अशा प्रकारच्या मदत कार्यामध्ये मोठ्या संख्येने सामील होत असतात.सामाजिक सेवा संस्था, समाजसेवक व नागरिकांनी केलेल्या मदतीबद्दल नगरसेवक भरत चव्हाण यांनी सर्वाचे आभार व्यक्त केले. तसेच येत्या काळातदेखील कोकण असो किंवा पश्चिम महाराष्ट्र सर्व आपत्तीग्रस्तांना जास्तीत जास्त मदत करण्याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून करणार असल्याचे नगरसेवक भरत चव्हाण यांनी सांगितले.


हेही वाचा – Covid-19 India: कोरोनाची दुसरी लाट संपलेली नाहीच; १८ जिल्ह्यांमध्ये कोरोना पुन्हा वेगाने वाढतोय