Thursday, May 13, 2021
27 C
Mumbai
घर क्राइम 'मेरी नही हुई तो मै किसी और के लायक नही छोडूंगा, असे...

‘मेरी नही हुई तो मै किसी और के लायक नही छोडूंगा, असे म्हणत…तरुणीचे छाटले ओठ

एकतर्फी प्रेमातून तरुणीचे ओठ छाटल्याची घटना भिवंडीमध्ये घडली आहे.

Related Story

- Advertisement -

दिवसेंदिवस एकतर्फी प्रेमातून घडणाऱ्या विकृत घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे राज्यातील महिलांचा सुरक्षेचा प्रश्न सातत्यानं उपस्थित होत आहे. नुकतेच एका तरुणीचे एकतर्फी प्रेमातून ओट छाटल्याची घटना भिवंडीमध्ये घडली आहे. या हल्ल्यात तरुणी जखमी झाली असून सध्या तिच्यावर केईएम रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या हत्येप्रकरणी आरोपी मुक्तार अब्दुल रहीम अंसारी (२३) आणि शाहिद या दोघांवर शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमके काय घडले?

भिवंडीमधील शांतीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहत असलेल्या एका तरुणीवर मुक्तार अब्दुल रहीम अंसारी यांचे प्रेम होते. तो तिचा गेल्या एक वर्षापासून सातत्याने पाठलाग करत होता. मात्र, तरुणी त्याला सातत्याने नकार देत होती. सदर मुलगी नकार देत असल्यामुळे त्यांनी तिला धमकी देण्यास सुरुवात केली. मात्र, तरी देखील ती त्याच्याकडे दुर्लक्ष करायची.

- Advertisement -

दरम्यान, ९ एप्रिल रोजी तरुणी घराबाहेर पडली. त्यावेळी मुक्तार अब्दुल रहीम अंसारी यांनी तिला अडवले. त्या दरम्यान त्याच्यासोबत त्याचा मित्र देखील होता. त्याचवेळी त्यांनी तिच्यावर हल्ला करत तिचे ओठ छाटले. या हल्ल्यात तरुणी गंभीर जखमी झाली. तिला तात्काळ जवळील स्व. इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर तिला ठाणे येथील कळवा रुग्णालयात पाठविण्यात आले. मात्र, ओठांवर सर्जरी करण्याची आवश्यकता असल्यामुळे डॉक्टरांनी तिला पुढील उपचारासाठी मुंबईच्या केईएम रुग्णालयात दाखल केले. दरम्या, याप्रकरणी मुक्तार आणि त्याचा साथीदार शाहिद या दोघांवर शांतीनगर पोलीस ठाण्यात विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, दोन्ही आरोपी फरार असून सध्या त्यांचा शोध सुरु आहे.


हेही वाचा – संतापजनक! वडिलांनी पैसे दिले नाही म्हणून बेरोजगार मुलाने केली हत्या


- Advertisement -

 

- Advertisement -