Uran :उरण नगरपरिषदेच्या डंपिंग ग्राऊंडबाबत उच्च न्यायालयाची नाराजी

उरण नगर परिषदेला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश

High Court displeases Uran Municipal Council over dumping ground at Kharfuti
Uran :उरण नगरपरिषदेच्या डंपिंग ग्राऊंडबाबत उच्च न्यायालयाची नाराजी

उरण नगर परिषदेच्या बोरी-पाखाडी येथील डंपिंग ग्राऊंडबाबत उच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केली असून, खारफुटीवर कचरा टाकणे हे अतिशय गंभीर असल्याचे मत नोंदविले आहे. डंपिंग ग्राऊंड इतरत्र हलविण्याबाबत यापूर्वी न्यायालयाला दिलेल्या हमीचे पालन न केल्यामुळे नाराजी व्यक्त करून येत्या १३ ऑक्टोबर रोजी नव्याने प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश नगर परिषदेला दिले आहेत.कचरा टाकण्यासाठी जिल्हाधिकार्‍यांकडून बोरी-पाखाडी येथे जागा देण्यात आली होती. मात्र या जागेच्या बाजूला सर्वत्र खारफुटी आहे.

डंपिंग ग्राऊंडला दिलेल्या जागेत कचरा संपूर्ण भरला असल्यामुळे तो बाजूच्या खारफुटीवर पसरला जात आहे. तसेच बाजूला असलेल्या हनुमान कोळीवाडा या गावाला या डंपिंग ग्राऊंडमुळे दुर्गंधी, तसेच प्रदूषणाचा त्रास सहन करावा लागत आहे. या विरोधात हनुमान कोळीवाडा गावातील मच्छीमार विकास संस्थेने २०१८ मध्ये उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यानंतर नगर परिषदेने खारफुटी असलेल्या प्रतिबंधित जागेवर कचरा न टाकण्याचे आणि लवकरच डम्पिंग ग्राऊंडसाठी इतरत्र जागा शोधण्याचे प्रतिज्ञापत्र दाखल केले होते.

मात्र तरी देखील कचरा बाजूच्या खारफुटीवर जेसीबाच्या सहाय्याने पसरला जात असल्याचे आणि खारफुटीवरील कचर्‍याला आग लावलर जात असल्याचे छायाचित्रांच्या सहाय्याने निदर्शनास आणून देण्यात आल्यामुळे उच्च न्यायालयाने याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. याबाबत प्रतिक्रियेसाठी मुख्याधिकारी संतोष माळी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता होऊ शकला नाही.


हे ही वाचा – Facebook, Insta, WhatsAPP पाठोपाठ आता Gmail डाऊन, ट्विटरवर तक्रारींचा पूर