दर महिन्याला अति जोखमीच्या गरोदर महिलांची तज्ञांकडून मोफत तपासणी आणि सोनोग्राफी होणार

High risk pregnant women examined and sonographed by a specialist every month in thane
दर महिन्याला अति जोखमीच्या गरोदर महिलांची तज्ञांकडून मोफत तपासणी आणि सोनोग्राफी होणार

केंद्र शासनामार्फत प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान अंतर्गत दुसऱ्या आणि तिसऱ्या तिमाहीतील गरोदर मातांना दर्जेदार सेवा देण्याच्या दृष्टिकोनातून सर्व राज्यांमध्ये प्रत्येक महिन्याच्या नऊ तारखेला अभियान राबविण्यात येत आहे. त्या अनुषंगाने भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका कार्यक्षेत्रात अंतर्गत ही सेवा अत्यंत चांगल्या प्रकारे सुरू ठेवण्यासाठी १५ प्राथमिक नागरी आरोग्य केंद्र येथे दर महिन्याच्या नऊ तारखेला जोखमीच्या मातांसाठी शिबिर आयोजित करून गरोदर महिला यांची स्त्री रोग तज्ञ मार्फत मोफत तपासणी करून प्रयोगशाळेत चाचण्या, अति जोखमीच्या गरोदर महिला निदान व समुपदेशन करण्यात येते.

संस्था स्तरावर सुरक्षित प्रसूतीबाबत आणि माता बालक सुदृढ होण्यासाठी समुपदेशन तसेच स्त्री-रोग तज्ज्ञांकडून गरोदर महिलांची तपासणी करण्यात येत असते. आवश्यकतेनुसार अति जोखमीच्या गरोदर महिला यांची सोनोग्राफी तपासणी आणि योग्य तज्ञांच्या सेवा मोफत उपलब्ध करून देण्यात येत असतात. या अभियानासाठी भिवंडी शहरातील खासगी वैद्यकीय व्यावसायिक स्त्री-रोग तज्ञ आपल्या सेवा विनामूल्य देत आहेत. याबद्दल त्यांचे महापालिकेतर्फे अभिनंदन करण्यात आले. या योजनेअंतर्गत महापालिकेच्या १५ नागरी आरोग्य केंद्राच्या ठिकाणी या महिन्याच्या नऊ तारखेला अशाप्रकारे अति जोखमीचा गरोदर महिला यांची स्त्री-रोग तज्ञांकडून तपासणी करून आवश्यक असेल, अशा गरोदर महिलांना मोफत सोनोग्राफी ची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या शिबिरामध्ये जोखमीच्या गरोदर महिलांनी आपली तपासणी करून सुरक्षित प्रसूती होईल, यासाठी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन महापौर प्रतिभा विलास पाटील यांनी केले आहे. तरी सर्व शहरातील गरोदर महिलांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन पालिकेतर्फे करण्यात येत आहे.


हेही वाचा – ठाण्यात कोरोनाचा कहर; ३१ मार्चपर्यंत लॉकडाऊन लागू