रायगड जिल्ह्यातील ऐतिहासिक स्मारके, स्थळे उघडण्यास जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांची मान्यता

कोरोनाच्या पार्श्वभूवर पर्यटनस्थळे बंद होती.

Historical monuments and places in Raigad district will be opened
रायगड जिल्ह्यातील ऐतिहासिक स्मारके, स्थळे उघडण्यास जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांची मान्यता
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद करण्यात आलेली रायगड जिल्ह्यातील ऐतिहासिक स्मारके, स्थळे उघडण्यास मान्यता रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी दिली आहे. कोरोनाचे नियम पाळत पर्यटकांना या स्थळांना भेट देण्यात येणार आहे. रायगड जिल्ह्यातीन ऐतिहासिक स्मारके आणि स्थळे उघडण्यास परवानगी भारतीय पुरातत्व सर्वेक्षण यांच्याकडे केली होती. त्यानुसार पर्यटन स्थळे खुली करण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे.

रायगड जिल्ह्यातील परवानगी मिळालेली ऐतिहासिक स्मारके/स्थळे…

१) महाड

 

महाड तालुक्यातील अचलोल येथील सोनगड (सोनगिरी), अलिबाग तालुक्यातील आगरकोट येथील कॅथेड्रल, चौकोनी किल्ला किंवा चौलची फॅक्टरी, चर्च आणि कॉन्वेंट ऑफ द ऑगस्टीनियन्स, डॉमिनिकन चर्च आणि कॉन्वेंट, येसू ईस्ट चर्च आणि कॉन्वेंट, कोथी, एक बुरूज, सेंट फ्रान्सिस झेवियर्स चॅपल, सतखानी बुरूज, दोन दरवाजे- हिराकोट जुना किल्ला, कुलाबा किल्ला.
२) कर्जत 
कर्जत तालुक्यातील आंबिवली येथील लेणी, रोहा तालुक्यातील बिरवाडी येथील बिरवाडी किल्ला, अलिबाग तालुक्यातील चौल येथील बारबरचा महाल, दादर (जिना), कमान, मस्जिद, राजकोट, सरखेल कान्होजी आंग्रेंची समाधी, कोर्लई किल्ला, पोलादपूर तालुक्यातील ढवळा येथील चंद्रगड, उरण घारापुरी येथील एलिफंटा लेणी, घारापूरी येथील एलिफंटा बेटावरील प्राचीन विटांचे स्तूप, रोहा तालुक्यातील घेरा सुरगड येथील घेरीयागड किंवा सूरगड किल्ला, रोहा घोसाळे येथील घोसाळगड किल्ला, मेढे येथील अवचितगड.
३) नागोठणे
नागोठणे ब्रिज, महाड मधील कडासरी कंगोरी येथील जुना किल्ला, कडासरी लिंगाणा येथील डोंगर, कोल येथील कोल लेणी, सर्वे नंबर ४९ व ५० मधील लेणी, पाचाड येथील जिजाऊ माता समाधी जिजाऊ माता वाडा, पाली येथील लेणी, रायगड किल्ला, पाली मधील गोमाशी येथील बौद्ध लेणी, कर्जत मधील कोंडाणे येथील कोंडाणे लेणी, पेठ येथील कोटाली किल्ल्याजवळील लेणी, कोटाली किल्ला, माणगाव मधील कुडा येथील कुडा लेणी, मुरूड येथील कसा (कमसा) किल्ला, राजापुरी येथील जंजिरा किल्ला, खोळकर नजिक घुमज येथील कबर, पाली मधील नाडसूर येथील थनाला लेणी, सुधागड मधील नेनावली येथील खडसंबला लेणी, तळा येथील तळा किल्ला. पर्यटकांनी पर्यटनाला जरूर यावे, मात्र शासनाने कोविड-१९ विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी वेळोवेळी निर्गमित केलेले प्रतिबंधात्मक आदेश व सुचविलेल्या उपाययोजनांचे काटेकोरपणे पालन करावे असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी केले आहे.