घरगणेशोत्सव २०२०गणेशोत्सव २०२०: लाडक्या बाप्पासाठी झटपट तयार करा 'हा' खास नैवेद्य

गणेशोत्सव २०२०: लाडक्या बाप्पासाठी झटपट तयार करा ‘हा’ खास नैवेद्य

Subscribe

गणेशोत्सवात आपण बाप्पासाठी वेगवेगळे नैवेद्य तयार करत असतो. त्यामुळे आज बाप्पासाठी थोडासा वेगळ्या प्रकारचा नैवेद्य करणार आहोत. हा नैवेद्य तुम्ही झटपट करू शकता. या नैवेद्याची रेसिपी कोकणी असून या रेसिपीचे नाव उंदलकाल असे आहे. तर मग जाणून घ्या कसा तयार करतात उंदलकाल.

साहित्य 

- Advertisement -

एक वाटी तांदळाचे पिठ, एक वाटी पाणी, दोन चमचे नारळाचे दूध, किसलेल्या गूळ, चिमुटभर मीठ, तीन-चार चमचे नारळाचा किस, सुका मेवा, तूप, विलेची, खसखस

कृती 

- Advertisement -

प्रथम पॅनमध्ये एक वाटी पाणी टाकून त्यामध्ये नारळाचे दूध, चिमुटभर मीठ आणि दोन चमचे गूळ टाकायचे. मग या मिश्रणाला उकळी काढून घ्यायची आणि गूळ विरघळल्यानंतर त्यामध्ये थोडे-थोडे तांदळाचे पिठ टाकायचे. यादरम्यान तांदळाच्या पिठ्याच्या गुठल्या होऊ नये याकरिता गॅस मंद आचेवर ठेवावा. चांगल्या प्रकारे हे मिश्रण मिक्स झाल्यानंतर गॅस बंद करून ते १० मिनिटे वाफ काढून घ्यावी. १० मिनिट झाल्यानंतर सर्व मिश्रण एका ताटात काढून ते व्यवस्थित एकजीव करावे. मग मिश्रण एकजीव करून झाल्यानंतर त्याचे छोटे-छोटे गोळे करून घ्यायचे. गोळे झाल्यानंतर एका पॅनमध्ये तूप टाकून ते गोळे तळायचे. ब्राउन कलर येईपर्यंत हे गोळे तळत राहायचे. मग तळलेले गोळे एका ताटात काढून उरलेल्या गरम तुपात सुका मेवा ब्राउन कलर येईपर्यंत तळायचा. त्यानंतर खसखस आणि नारळाचा किस टाकायचा. मग हे सर्व मिश्रम चांगल्या प्रकारे भाजल्यानंतर त्यात तीन चमचे गूळ घालायचा आहे. गूळ विरघळलेपर्यंत हे मिश्रण भाजायचे आणि त्यानंतर त्यात तळलेले छोटे गोळे टाकायचे. याचा स्वाद आणखी वाढण्यासाठी त्यात वेलची पावडर टाकायची आहे. अशा प्रकारे तुम्ही यावर्षी गणपती बाप्पासाठी एक वेगळी झटपट उंदलकालची रेसिपी तयार करू शकता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -