Sunday, June 13, 2021
27 C
Mumbai
घर क्राइम परस्त्रीचा फोन उचलल्याने पतीने बायकोच्या डोक्यात घातला पहार

परस्त्रीचा फोन उचलल्याने पतीने बायकोच्या डोक्यात घातला पहार

परस्त्रीचा फोन उचल्याने पतीने पत्नीच्या डोक्यात पहार घातल्याची धक्कादायक घटना सोलापूरमध्ये घडली आहे.

Related Story

- Advertisement -

दिवसेंदिवस गुन्हांच्या सत्रात वाढ होताना दिसत आहे. त्यातच एक धक्कादायक प्रकार सोलापूरमध्ये घडल्याचे समोर आले आहे. परस्त्रीचा फोन उचल्याने पतीने पत्नीच्या डोक्यात पहार घातली. यामध्ये पत्नी जखमी झाली असून सध्या तिच्यावर एका रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

नेमके काय घडले?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार; सोलापूरमधील बार्शी तालुक्यातील उपळाई ठोंगे येथे संजय चेके हे कुटुंब राहते. दरम्यान, संजय यांनी आपला मोबाईल घरात ठेवून बाहेर गेले. त्यावेळी एका महिलेचा त्याच्या फोनवर फोन आला. पती घरात नसल्यामुळे संजय यांची पत्नी बालिका चेके यांनी फोन उचलला.

- Advertisement -

‘मी घरात नसताना तू फोन का उचललास असा जाब विचारत पतीने तिला मारहाण केली. यावेळी रागाच्या भरात पतीने तिच्यावर प्रहारने हल्ला केला. बालिका या हल्ल्यामध्ये जखमी झाल्या असून त्यांच्यावर बार्शीच्या जगदाळे मामा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत’.

दरम्यान, या प्रकरणाची पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांनी आरोपी पतीला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. यामध्ये पोलीस घटनेचा अधिक तपास करत असून नेमके काय घडलं याचा शोध घेत आहेत.


- Advertisement -

हेही वाचा – मुंबई-आग्रा महामार्गावर पशुखाद्याच्या ट्रकमधून लाखोंचा अवैध मद्यसाठा जप्त


 

- Advertisement -