घरताज्या घडामोडीनोकरभरती सुरू न केल्यास बहुजन समाजातील संताप वाढेल -वडेट्टीवार

नोकरभरती सुरू न केल्यास बहुजन समाजातील संताप वाढेल -वडेट्टीवार

Subscribe

मराठा आरक्षणाचा प्रश्न हा सुप्रीम कोर्टात प्रलंबित आहे. या पार्श्वभूमीवर नोकरभरतीचा विषय लक्षात घेता केवळ एका समाजासाठी इतर समाजातील तरुणांना वेठीस धरू नये, अशी संतप्त प्रतिक्रिया मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे. मराठा समाजाच्या जागा राखीव ठेवून इतर नोकरभरती सुरू करा. ओबीसींसह इतर मुलांचे वय देखील वाढत चालले आहे. त्यामुळे नोकरभरती सुरू केली नाहीतर बहुजन समाजातील संताप अधिक वाढेल, असेही वडेट्टीवार म्हणाले.

राष्ट्रीय ओबीसी महासंघाने तात्काळ नोकरभरती सुरू करावी अशी मागणी केलेली, यावर विचारण्यात आले असता विजय वडेट्टीवार म्हणाले की, ‘‘किती थांबायचं, किती या तरुणांच्या जीवाशी खेळ खेळायचा.

- Advertisement -

किती तरुणांचे आयुष्य आम्ही आता उद्ध्वस्त करायचे? महाराष्ट्रात बहुसंख्य असलेले लोक आहेत. मला कोणावरही अन्याय करायचा नाही. मराठा समाजातील विद्यार्थ्यांचे नुकसान झाले पाहिजे, या मताचा मी नाही. पण आता न्यायालयाने ते थांबवले आहे. न्यायालयाचा निकाल कधी येईल, किती दिवसांत येईल याची आता किती वाट बघायची हा देखील एक विषय आहे. या सगळ्या परिस्थितीत आपण ८० टक्के विद्यार्थ्यांना वेठीस धरणे चुकीचे आहे’’, अशी भावना वडेट्टीवार यांनी व्यक्त केली.

यामध्ये आदिवासी आहेत. दलित, ओबीसी, वीजेएनटी, एसबीसी आहेत. हा केवढा मोठा वर्ग आहे. त्यांचे वय वाढत चालले आहे. मला वाटते की, जी काही राखीव जागा आहे ती बाजूला ठेवा आणि बाकीच्या भरत्या करा. नाहीतर ओबीसी समाजातील लोकांमध्ये जो असंतोष आहे तो उद्या रस्त्यावर आला तर खूप अडचण होईल. सगळ्यामध्येच असंतोष वाढेल. कालच्या मंत्रिमंडळ बैठकीत इतर नोकर भरती सुरू करण्याची मागणी केली आहे. तातडीने यावर निर्णय घेण्याची विनंतीही मुख्यमंत्र्यांना केली आहे, असे विजय वडेट्टीवार यांनी सांगितले.

- Advertisement -

मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारने संवेदनशीलपणाने लक्ष देण्याची गरज आहे. मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक प्रवेश आणि नोकर्‍यांचा प्रश्न आहे. यासोबत ओबीसी समाजाच्या विद्यार्थ्यांचाही प्रश्न आहे. ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांवर नोकरभरतीत अन्याय होता कामा नये.
-प्रवीण दरेकर, विरोधी पक्षनेते, विधान परिषद.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -