घरताज्या घडामोडीजेएनपीटी परिसरात बायोडिझेलची बेकायदेशीर विक्री, यंत्रणांची डोळेझाक

जेएनपीटी परिसरात बायोडिझेलची बेकायदेशीर विक्री, यंत्रणांची डोळेझाक

Subscribe

न्हावा शेवा पोलिसांकडून तब्बल 27 हजार लिटर बायोडिझल जप्त

इंधनाचे दिवसेंदिवस भाव वाढत असल्याने वाहतूक व्यवसाय करणारे व्यावसायिक मेटाकूटीला आले आहेत. अनेक वाहन चालक, व्यावसायिक पर्यायी इंधनाचा वापर करत आहेत. उरणमध्ये अशा प्रकारे बायोडिझेलच्या नावाखाली अनधिकृतपणे इंधन विक्रीचा व्यवसाय जोरात सुरू आहे. जेएनपीटी परिसरात अशाच प्रकारे बेकायदा बायोडिझेल विक्री करणाऱ्या एका लॉजिस्टीक कंपनीवर न्हावाशेवा पोलीसांनी धाड टाकून तब्बल २७ हजार ३०० लिटर बायोडिझेल जप्त करण्यात आले आहे.

पोलिसांनी केलेल्या कारवाईत १० लाख रूपये किंमतीची एक केबीन, १५ लाख ५३ हजार रूपये किंमतीचा एक टँकर, २ लाख रूपये किंमतीची लोखंडी टाकी, ७० हजार रूपये किंमतीची डिझेल भरण्याची मशिन, एक मोटार आणि १५ लाख ५० हजार रूपयांचे बोगस बायोडिझेल अशी लाखो रूपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या प्रकरणी न्हावा शेवा पोलिसांनी टँकर चालक मृत्यूंजय कुमार जयशंकर पांडे आणि संजय बाळूभाई मशरू यांना अटक केली आहे. तर हा अनधिकृत व्यवसाय करणारे टी.एल लॉजिस्टिकी कंपनीचे मालक दिलेश गोगरी यांच्यावर भादवि कलम आणि अत्यावश्यक वस्तू अधिनियम १९५५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

जेएनपीटीच्या अनुषंगाने या परिसरात वाहतूक व्यवसाय मोठ्या प्रमाणात सूरू असतो. रोज हजारो अवजड वाहने  जेएनपीटीमध्ये माल घेवून येत असतात. सध्या इंधनाचे दर गगनाला भिडले असल्यामुळे वाहतूकीचा व्यवसाय करणे अवघड बनले आहे. त्यातच काहीनी जेएनपीटी परिसरात बायोडिझेलच्या नावाखाली स्वस्त डिझेल देण्याचे अनधिकृत धंदे या परिसरात सरू केले असून जेएनपीटी परिसरातील पार्कींगच्या ठिकाणी हे धोकादायक व्यवसाय बिनादिक्कीतपणे सूरू आहेत. गुजरात किंवा बाहेरच्या राज्यातून हे बोगस इंधन येथे आणून विकले जाते. जेएनपीटी परिसरात पकडलेला हा टँकर गुजरात मधून एडीबल ऑईल (गोडेतेल) च्या नावाने आणला होता. अशा प्रकारे रोज डझनभर टँकर या परिसरात येवून हे बोगस बायोडिझेल विक्री करत असतात. काही दिवसांपूर्वी उरण पोलिसांनी देखील अशा प्रकारच्या दोन कारवाया केल्या होत्या.न्हावा शेवा पोलिसांनी केलेली या कारवाईवरून किती मोठ्या प्रमाणात हा व्यवसाय सुरू असल्याचे सिद्ध होत आहे. याबाबत न्हावाशेवा पोलिस अधिक तपास करत आहेत.

                                                                                                 -राजकुमार भगत

- Advertisement -

हेही वाचा – Afghanistan Crisis: भारताचा इशारा; …तर अफगाणिस्तानात लष्करी कारवाई – राजनाथ सिंह


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -