खालापूरात रसायनमिश्रित पावडरमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात

प्रदूषणाच्या समस्यांची दिवसेंदिवस वाढ

in khalapur the heath of the citizens is endangered due to the chemical powder
खालापूरात रसायनमिश्रित पावडरमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात

खालापूर तालुक्यात प्रदूषणाची समस्या दिवसेंदिवस वाढत असताना तळवली-लोहप गावाच्या हद्दीत असणार्‍या आदित्य बिर्ला हायटेक कार्बन कंपनीतून काळ्या रंगाची रसायनमिश्रित पावडर हवेतून पसरत असल्यामुळे स्थानिक ग्रामस्थांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. ही पावडर हवेद्वारे शेतजमीनी, पिण्याचे पाणी, तसेच वातावरणात पसरत असल्याने लहानापासून मोठ्यापर्यंत अनेकांना त्याच्या विशिष्ट वासामुळे खोकला आणि श्वासाचा त्रास होत असून, जीवघेण्या आजारांना सामोरे जावे लागण्याची भीत व्यक्त केली जात आहे. हा प्रकार तात्काळ थांबविण्यात यावा यासाठी लोहप ग्रामस्थ मंडळचे अतुल शेलार, देविदास पाटील, बबन पाटील, मोहन पाटील, अनंता पाटील यांनी महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळासह जिल्हाधिकारी आणि इतरांकडे तक्रार अर्ज सादर केला आहे. गेल्या दीड वर्षात कोरोनाच्या सावटामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यातच वाढते प्रदूषण हेसुद्धा नागरिकांच्या जीवावर बेतत आहे.प्रदूषणा मुळे जेष्ठ नागरिकांसह महिला, शाळकरी विध्यार्थी व नागरिकांना खोकला, दमा सारख्या गंभीर आजाराला सामोरे जावे लागत आहे. या दिवसेंदिवस वाढत चाललेल्या प्रदूषणामप


हे ही वाचा – कार भाड्याने देणे पडलं महागात! पुण्यात ३०० कारमालकांची फसवणूक