घरताज्या घडामोडीपनवेलच्या सराफा बाजारात दरोडा,कर्मचार्‍यावर हल्ला करुन लुटारू पसार

पनवेलच्या सराफा बाजारात दरोडा,कर्मचार्‍यावर हल्ला करुन लुटारू पसार

Subscribe

बॅगमधे साधारणतः १२०० ग्रॅम सोने होते, ज्याची अंदाजे किंमत ६०-७० लाख असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

पनवेल शहरातील सोने पॉलिश करणार्‍या दुकानातून सोने घेऊन बाहेर जाणाऱ्या व्यापारार्‍याला मारहाण करण्यात आली. सराफा बाजारात बुधवार ४ ऑगस्टला दुपारी पावणे चारच्या सुमारास एका व्यापारावर अज्ञात इसमांनी हल्ला करुन साेने लुटण्याची धक्कादायक घटना घडली. दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी पनवेल शहरातील जोशी आळी येथील गोकुळ गोल्ड सोसायटीमध्ये पहिल्या मजल्यावरील सोन्याला पॉलिश करणाऱ्या दुकानातील कर्मचारी सोन्याचा ऐवज दुकानातून खाली घेऊन येत असताना दोन अज्ञात इसमांनी त्याच्या डोक्यात अवजड वस्तूने हल्ला करून त्याच्याकडील सोन्याची बॅग काढून घेऊन ते चोर पसार झाले. बॅगमधे साधारणतः १२०० ग्रॅम सोने होते, ज्याची अंदाजे किंमत ६०-७० लाख असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.
रावसाहेब कोळेकर यांचे सोन्याच्या दागिन्यांना पॉलिश करण्याचे दुकाने असून त्या ठिकाणी काम करणारा कर्मचारी दीपेश जैन हा दुकानातील सोने बॅगेच भरुन खाली उतरत असताना दोघांनी त्याला जिन्यामध्येच गाठले. त्यानंतर
त्याच्या डोक्यात पिस्तुलाचा दस्ता मारला आणि त्याच्या हातात असलेली पिशवी हिसकावून घेत ते लुटारु दुचाकीवरुन पसार झाले. यावेळी दिपेश याने जखमी अवस्थेततही त्याचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. मात्र नजीकच्या गल्लीतून चोर दुचाकीवरुन पसार झाले.
जखमी दिपेश जैन यांना नजीकच्या पटेल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेतील आरोपी सीसीटीव्हीत कैद झाले असून त्यांची त्यांनी वापरलेल्या दुचाकीचा क्रमांक ही हाती लागला आहे. आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिस पथके रवाना झाली आहेत.

हेही वाचा – श्रीमलंगगड भागात दोन तरुणींना बेदम मारहाण तरुणांनाही चोप; सहा टवाळखोरांवर गुन्हा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -