घरताज्या घडामोडीरायगडात सेनेपाठोपाठ काँग्रेसचाही राष्ट्रवादीला इशारा

रायगडात सेनेपाठोपाठ काँग्रेसचाही राष्ट्रवादीला इशारा

Subscribe

आम्हाला गृहीत धरू नका असा इशारा घरत यांनी राष्ट्रवादीला दिला.

रायगड जिल्ह्यात शिवसेनेपाठोपाठ कॉंग्रेसनेही राष्ट्रवादी कॉंग्रेसविरोधी नाराजी व्यक्त केली आहे. सत्तेत सन्मानजनक वाटा देणार नसाल तर यापुढे आम्हाला गृहीत धरू नका, असा इशारा कॉंग्रेसच्या जिल्हाध्यक्षांनी राष्ट्रवादीला दिला आहे.  माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी श्रीवर्धन येथील मेळाव्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसविरोधात जोरदार टिका केली. ज्याचे पडसाद राज्यभरात उमटले.  माजी मंत्री अनंत गीते यांनी राष्ट्रवादीवर टीका करुन पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधला होता.

काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांचा इशारा

कॉंग्रेसच्या जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसबाबत उघड नाराजी व्यक्त केली. काही लोक आमची मदत घेऊन सत्तेत गेले. नंतर आम्हाला विसरले. जिल्हा परिषदेत सत्ता मिळवताना कॉंग्रेसची मदत घेतली, पण नंतर एकही सभापती पद दिले नाही. आमच्या मदतीने आमदार आणि खासदार झाले, सत्ता मिळवली, पण नंतर आम्हाला फसवले याचे शल्य कॉंग्रेस कार्यकर्त्यांमध्ये आहे. त्यामुळे यापुढील काळात आम्हाला गृहीत धरू नका असा इशारा घरत यांनी राष्ट्रवादीला दिला. आमच्याकडे आता शिवसेना व इतर समविचारी पक्षांशी आघाडीचा पर्याय खुला असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

- Advertisement -

महाविकास आघाडी सत्तेसाठीची तडजोड आहे – अनंत गीते

महाविकास आघाडी ही आघाडी सरकार स्थापन करण्यासाठी केलेली तडजोड आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस  एकत्र येऊ शकत नाहीत, तर शिवसेना काँग्रेसी विचाराची कशी होऊ शकते? त्यामुळे शिवसैनिकांनी सज्ज व्हा सर्व स्थानिक स्वराज्य समित्यांच्या निवडणूका शिवसेना स्वबळावर लढणार असून, हरिहरेश्वर भूमीतून हे रणशिंग फुंकले गेले, असे वक्तव्य माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी केले.


हे ही वाचा – राज्यात अघटीत घडल्यावर अन्य राज्यांकडे बोट दाखवणं ही असंवेदनशीलता – फडणवीस

- Advertisement -

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -