Eco friendly bappa Competition
घर ताज्या घडामोडी इमारतीच्या लिफ्टमध्ये महिला असुरक्षित; पनवेलच्या हायप्रोफाईल सोसायटीतून धक्कादायक प्रकार उघडकीस

इमारतीच्या लिफ्टमध्ये महिला असुरक्षित; पनवेलच्या हायप्रोफाईल सोसायटीतून धक्कादायक प्रकार उघडकीस

Subscribe

नवी मुंबईच्या एका हायप्रोफाईल सोसायटीत एका इसमाने महिलेसमोर अश्लिल चाळे केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. त्या इसमाचे हे कृत्य पाहून अस्वस्था झालेल्या महिलेने थेट पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

नवी मुंबईच्या एका हायप्रोफाईल सोसायटीत एका इसमाने महिलेसमोर अश्लिल चाळे केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. त्या इसमाचे हे कृत्य पाहून अस्वस्था झालेल्या महिलेने थेट पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. महिलेने तक्रार केल्यानंतर पोलिसांनी लिफ्ट मधील सीसीटीव्ही तपासून ३० वर्षीय आरोपीला अटक केली. या घटनेमुळे महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे. (in taloja panvel a man did obscene act with women in residential society lift)

मिळालेल्या माहितीनुसार, पनवेल मधील तळोजा येथील सेक्टर १४ मधील मार्बल आर्च को-ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटीत हा प्रकार घडला. ही सर्व घटना लिफ्टमधील CCTV कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या CCTVतील फुटेजमध्ये एक मध्यवयीन पुरुष आणि एक महिला दोघेजण लिफ्टमध्ये असल्याचे दिसत आहे. या पुरुषाने लिफ्टमध्ये महिलेला एकटे बघून अश्लिल चाळे केले. आरोपी पुरुष अनेक वेळ या महिलेकडे पाहून अश्लिल कृत्य करत असल्याचे CCTV कॅमेऱ्यात कैद झाले.

- Advertisement -

नेमकी घटना काय?

मार्बल आर्चच्या लिफ्टमधून एक महिला जात असताना एक तरुण तिच्या पाठोपाठ गेला. त्यावेळी लिफ्टमध्ये दोघांशिवाय कोणीच नव्हते. याच परिस्थितीचा फायदा घेऊन तरुणाने महिलेसमोर अश्लील कृत्य केले. तसेच दुसऱ्या लिफ्टमधून बाहेर येणाऱ्या महिलेच्या अंगाला हात लावून तिचा विनयभंग केला असल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. मार्बल आर्च सोसायटीमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीने सीसीटीव्हीमध्ये कैद झालेला प्रकार ट्विट केला आहे. त्यात त्याने पोलिसांना टॅग केले आहे. महिलांसमोर अश्लील चाळे करणाऱ्या तरुणाविरोधात कडक कारवाई करण्याची मागणी सोसायटीतील रहिवाशांनी केली आहे.

- Advertisement -

पोलिसांनी हे कृत्य करणाऱ्या आरोपीला 354 अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली आहे. तसेच, पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदार महिला आणि आरोपी दोघेही एकाच सोसायटीमध्ये राहतात. या घटनेमुळे सोसाटीमध्ये राहणाऱ्या महिलांमध्ये भिती निर्माण झाली आहे. या प्रकारामुळे महिलांच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.


हेही वाचा – अलिबागमधील काशिद समुद्रात ५ जण बुडाले; दोघांचा मृत्यू

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -