Thursday, February 25, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी Live Update: मध्य रेल्वेवर आज मेगा ब्लॉक

Live Update: मध्य रेल्वेवर आज मेगा ब्लॉक

Related Story

- Advertisement -

मध्य रेल्वेवर आज मेगा ब्लॉक असणार आहे. माटुंगा ते मुलुंड आणि चुनाभट्टी ते वांद्रे दरम्यान हा मेगा ब्लॉक असणार आहे. सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत हा मेगा ब्लॉक असेल. या काळात काही लोकलच्या फेऱ्या बंद असणार आहेत.


अकारावीला प्रवेश घेता न आलेल्या विद्यार्थांना आता प्रवेश घेता येणार आहे. विद्यार्थांच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेमध्ये मुदतवाढ देण्यात आली आहे. १६ फेब्रुवारी पर्यंत विद्यार्थी ऑनलाईन प्रवेश घेऊ शकतात.


- Advertisement -

मुंबईत सलग सहाव्या दिवशी पेट्रोल डिझेलच्या किंमतीत वाढ झाली आहे. मुंबईत पेट्रोलचे दर ९५.१९ रुपयांवर पोहचले आहेत. डिझेलच्या किंमती या ८६.०२ रूपये झाला आहे. त्यामुळे आता पेट्रोल डिझेलच्या किंमती शंभरी गाठणार का याकडे सर्वांचे लक्ष आहे.


नागपूर जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. गेल्या २४ तासात नागपूरमध्ये ४८६ नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. गेल्या आठवड्यापासून नव्या कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे.

- Advertisement -