घरअर्थसंकल्प २०२२Union Budget 2022 : देशात India Post ची १.५ लाख ATM ची...

Union Budget 2022 : देशात India Post ची १.५ लाख ATM ची कनेक्टिव्हिटी, अर्थमंत्र्यांची घोषणा

Subscribe

सर्वसामान्य ग्रामीण भारताच्या जनतेच्या आर्थिक सक्षमतेसाठी पोस्टाच्या एटीएमची सुविधा तसेच शेतकऱ्यांसाठी सप्लाय चैन कनेक्टिव्हिटीसाठी रेल्वेची मदत होणार आहे. दीड लाख एटीएमची उभारणी ही कोअर बॅंकिंग सोल्यूशन अंतर्गत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळेच सर्वसामान्यांनाही आर्थिक लाभ घेता येणार आहेत. पोस्टाच्या एटीएमच्या सुविधेतून सर्वसामान्यांचे आर्थिक व्यवहार करण्याची क्षमतावाढ करण्यात येणार आहे. ग्रामीण भागातील पोस्ट ऑफिसेस थेट बॅंकांशी पेमेंट गेटवेशी कनेक्टेड होणार आहेत. त्यामुळे कोणताही व्यवहार ऑनलाईन माध्यमातून करणे शक्य होणार आहे.

- Advertisement -

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी पोस्टाच्या कनेक्टिव्हिटीच्या माध्यमातून सर्वसामान्यांसाठी काही घोषणा केल्या आहेत. त्यामध्ये १.५ लाख पोस्ट ऑफिसेस ही कोअर बॅंकिंग सिस्टिमअंतर्गत विकसित होणार आहेत. सर्वसामान्यांना आर्थिक सुविधांची उपलब्धतता करून देणे हे योजनेचे उदिष्ट आहे. कुठेही, कधीही पोस्ट ऑफिसच्या सुविधांचा लाभ हा योजनांच्या माध्यमातून घेता येईल.

सर्वसामान्यांना नेट बॅंकिंग, मोबाईल बॅंकिंग, एटीएम आणि पैसे ऑनलाईन ट्रान्सफर करण्याचीही सुविधा त्यामध्ये असेल. याचा लाभ हा शेतकरी, जेष्ठ नागरिक यांना होणार आहे. तसेच ग्रामीण भागातील लोकांना आर्थिक समावेशकतेसाठीही या कनेक्टिव्हिटीचा उपयोग होईल.

- Advertisement -

मल्टीमोडल मुव्हमेंट अंतर्गत रेल्वेकडून नवी उत्पादनांसोबतच कार्यक्षम अशा लॉजिस्टिक सेवेची निर्मिती करणे अपेक्षित आहे. त्यामध्ये छोटे शेतकरी आणि सुक्ष्म तसेच मध्यम एंटप्राजेसची कनेक्टिव्हिटी अपेक्षित आहे. त्यामध्ये पोस्टल आणि रेल्वे नेटवर्कच्या माध्यमातून पार्सलची सुविधा देण्यासाठी उपयोग ठरणार आहे.


 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -