घरताज्या घडामोडीकलामहर्षी चित्रपट निर्माते बाबूराव पेंटर

कलामहर्षी चित्रपट निर्माते बाबूराव पेंटर

Subscribe

बाबूराव कृष्णाजी मेस्त्री उर्फ बाबूराव पेंटर यांचा आज स्मृतिदिन. बाबूराव हे प्रसिद्ध महाराष्ट्रीय चित्रकार, शिल्पकार आणि चित्रपट-निर्माते व दिग्दर्शक होते. त्यांचा जन्म 3 जून 1890 रोजी कोल्हापूर येथे झाला. बाबूरावांचा लौकिक चित्रकार म्हणून असला, तरी त्यांना खरीखुरी कीर्ती लाभली ती त्यांनी केलेल्या चित्रपटक्षेत्रातील कामगिरीमुळे. आपले आतेभाऊ

आनंदराव मेस्त्री यांच्या मदतीने त्यांनी ‘डेक्कन सिनेमा’ सुरू केला होता, पण तो लवकरच बंद पडला, त्यानंतर १९१३ मध्ये त्या दोघांनी बाबूराव रूईकर यांच्यासह ‘महाराष्ट्र सिनेमा’ या चित्रपट निर्मितिसंस्थेची निर्मिती केली; ती बंद करून पुढे १ डिसेंबर १९१७ रोजी आपल्या बंधूंच्या स्मरणार्थ बाबूरावांनी ‘महाराष्ट्र फिल्म कंपनी’ची स्थापना केली आणि १९१९ मध्ये ‘सैरंध्री’ या आपल्या कलात्मक मूकपटाची निर्मिती केली.

- Advertisement -

कल्पकता, भव्यता, स्त्रियांनीच केलेल्या स्त्री भूमिका आणि पौराणिक काळातील राजवैभवाचे दर्शन हे या चित्रपटाचे वैशिष्ठ्य होते. ७ फेब्रुवारी १९२० रोजी पुण्याच्या आर्यन सिनेमागृहात सैरंध्री प्रदर्शित झाला आणि लोकमान्य टिळकांनी हा चित्रपट पहिला (८ फेब्रुवारी १९२०). त्यांनी बाबूरांवाना ‘सिनेमा केसरी’ या उपाधीने गौरविले. महाराष्ट्र फिल्म कंपनीद्वारा बाबूरावांनी १९२०-३० या दशकात एकूण १७ चित्रपटांची निर्मिती केली. त्यांपैकी ‘वत्सलाहरणा (१९२१) व ‘भक्त प्रल्हाद’ (१९२६) हे पौराणिक, तर ‘सिंहगड’ (१९२३),‘कल्याण खजिना’ (१९२४), ‘सती पद्मिनी’ (१९२४) व ‘शहाला शह’ (१९२५) हे ऐतिहासिक आणि ‘सावकारी पाश’ (१९२५) हा सामाजिक कथानकावरील वास्तववादी चित्रपट होय. अशा या श्रेष्ठ कलामहर्षीचे १६ जानेवारी १९५४ रोजी निधन झाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -