घरठाणेकळवा छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाच्या अधिष्ठातासह उपअधिष्ठातांवर निलंबनाची कारवाई

कळवा छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाच्या अधिष्ठातासह उपअधिष्ठातांवर निलंबनाची कारवाई

Subscribe

ठाणे महापालिकेच्या कळवा, छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाचे मुख्य अधिष्ठाता डॉ. योगेश शर्मा आणि उप अधिष्ठाता डॉ. सुचितकुमार कामखेडकर या दोघांवर रुग्णालयातील असुविधा आणि अनास्थेसाठी जबाबदार धरत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या निलंबनाचे आदेश दिले.

ठाणे : ठाणे महापालिकेच्या कळवा, छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाचे मुख्य अधिष्ठाता डॉ. योगेश शर्मा आणि उप अधिष्ठाता डॉ. सुचितकुमार कामखेडकर या दोघांवर रुग्णालयातील असुविधा आणि अनास्थेसाठी जबाबदार धरत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या निलंबनाचे आदेश दिले. त्यानंतर ठाणे महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी निंलबनाची कारवाई केली आहे. (Inform the suspension action against the Superintendent and Deputy Superintendent of Chhatrapati Shivaji Maharaj Hospital)

मुख्यमंत्र्यांचे बदलते ठाणे या अंतर्गत शहरातील विविध प्रकल्पांचे लोकार्पण आणि भुमीपुजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील प्रसुतीगृहासह वाचनालय, वृत्तपत्र वाचन केंद्राचेही लोकार्पण ही मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलतांना शिंदे यांनी या रुग्णालयातील बेडची क्षमता वाढविण्याच्या सुचना आयुक्तांना दिल्या. तसेच या रुग्णालयावरील ताण वाढत आहे. परंतु असे असतांना येथील डॉक्टर प्रामाणिकपणे रुग्णांची सेवा करीत आहेत. मात्र याच शिकाऊ डॉक्टरांच्या हॉस्टेलमध्ये असुविधा असल्याचे दिसत असल्याचे त्यांनी सांगितले.

- Advertisement -

वास्तविक पाहता या डॉक्टरांना चांगल्या सोई सुविधा पुरविण्याची जबाबदारी ही रुग्णालय प्रशासनाची असतांनाही त्याकडे कानाडोळा किंवा दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यावर कठोर कारवाई करण्याचे आदेश त्यांनी दिले होते.

त्यानुसार, काही तासातच कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. योगेश शर्मा आणि उप अधिष्ठाता डॉ. सुचितकुमार कामखेडकर या दोघांवर कळवा रुग्णालयातील असुविधा आणि अनास्थेसाठी जबाबदार धरत निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – नवी मुंबईतील रेल्वेच्या विविध समस्यांवर रावसाहेब दानवेंनी घेतली आढावा बैठक

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -