घरताज्या घडामोडीतिबोटी खंड्या बनला रायगडची शान, जिल्हा पक्षी म्हणून मिळाला मान

तिबोटी खंड्या बनला रायगडची शान, जिल्हा पक्षी म्हणून मिळाला मान

Subscribe

रायगड जिल्हा पक्षी म्हणून घोषित केल्याने या पक्षाचे जतन व संवर्धन करणे करीता मदत होणार आहे.

पनवेल तालुक्यातील कर्नाळा अभयारण्यासह रायगड जिल्ह्यातील अनेक भागांत ‘तिबोटी खंड्या’ हा पक्षी आढळतो. याच  ‘तिबोटी खंड्या’ पक्ष्याला रायगड जिल्हा पक्षी म्हणून ओळख मिळणार आहे. याबाबतची घोषणा रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांनी जागतिक पर्यटन दिनानिमित्त घेण्यातआलेल्या कार्यक्रमात केली. अनेक पर्यटक तिबोटी खंड्याचे दर्शन व्हावे म्हणून कर्नाळा पक्षी अभयारण्याला भेट देतात. त्यामुळे कर्नाळा पक्षी अभयारण्यामध्ये अधिवास असलेला मनमोहक आणि सुंदर असा पक्षी ‘तिबोटी खंड्या’ oriental dwarf kingfisher याला रायगड जिल्हा पक्षी म्हणून ओळख मिळाल्यास पर्यटनवृध्दी होईल,असे पालकमंत्री आदिती तटकरे यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकी वेळी घोषित केले.
जिल्ह्यात माहे मे ते ऑक्टोबर पर्यंत या पक्षाचा रहिवास आढळून येतो. जंगलात ओढा, तलाव, मातीच्या कड्यात जिथे जमीन भुसभुसीत असेल तिथे एक मीटर घरटे करून हे पक्षी राहतात. हा पक्षी त्याचा आकार व चमकदार रंगामुळे वैशिष्ट्यपूर्ण वाटतो. कपाळावर काळा डाग, मानेच्या बाजूला निळा आणि पांढरा रंग, पंख गडद निळ्या व काळ्या रंगाचे असतात. मानेवरील भाग पिवळसर केशरी असतो. चोच पिवळसर नारंगी रंगाची असून शेपटी नारंगी गुलाबी असते. पक्षाच्या तळव्याला तीन बोटे असल्याने याला ‘तिबोटी खंड्या’ असे म्हणतात. रायगड जिल्हा पक्षी म्हणून घोषित केल्याने या पक्षाचे जतन व संवर्धन करणे करीता मदत होणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -