घरठाणेमहापालिकेच्या शाळेतील मुले उपग्रह बनवितात हे अभिमानास्पद; आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याकडून...

महापालिकेच्या शाळेतील मुले उपग्रह बनवितात हे अभिमानास्पद; आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याकडून गौरव

Subscribe

महापालिका शाळातून विदयार्थ्यांना यापुढेही कुठल्याही उपक्रमात सहभाग घ्यावयाचा झाल्यास निधीची कमतरता भासू देणार नाही, असे आश्वासन आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी यावेळी दिले.

महानगरपालिकेच्या शाळेतील मुले उपग्रह बनवितात ही एक मोठी, अभिमानास्पद गोष्ट आहे. असे उद्गार महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी काढले. डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाऊंडेशन आणि स्पेस झोन इंडिया आयोजित स्पेस रिचर्स पेलोड क्यूब्ज चॅलेंज २०२१ साठी महापालिकेच्या शाळातून १० विद्यार्थ्यांनी उपग्रह बनविण्याच्या मोहिमेत सहभाग घेतला.

मुलांना प्रशस्तीपत्र देवून गौरवितांना पालिका आयुक्तांनी हे उद्गार काढले. मुलांनी अभ्यासाबरोबरच क्रीडा क्षेत्रातही नैपुण्य मिळवावे व पुढील आयुष्यात प्रगती करावी, अशा भरभरुन शुभेच्छा महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी यावेळी उपस्थित विदयार्थ्यांना दिल्या. महापालिका शाळातून विदयार्थ्यांना यापुढेही कुठल्याही उपक्रमात सहभाग घ्यावयाचा झाल्यास निधीची कमतरता भासू देणार नाही, असे आश्वासन आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी यावेळी दिले.

- Advertisement -

डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाऊंडेशन ,रामेश्वरम, तामिळनाडू आणि स्पेस झोन इंडिया आयोजित स्पेस रिचर्स पेलोड क्यूब्ज चॅलेंज २०२१ साठी सदर फाऊंडेशनचे सचिव मिलींद चौधरी यांनी मार्टिन ग्रुप या संस्थेमार्फत महापालिकेच्या महात्मा फुले प्राथमिक विदयालय,शाळा बारावे, बंदे अली खाँ महापालिका शाळा क्र. ९९/१२, उर्दू बल्याणी, तिसाई प्राथमिक विदयालय, तिसगाव, मनपा शाळा क्र. १८,  मनपा शाळा क्र. १२, उंबर्डे, प्रबोधनकार ठाकरे मनपा शाळा क्र.१९ नेतीवली या शाळातून १० विदयार्थ्यांना उपग्रह बनविण्याचा मोहिमेत सहभागी करुन घेतले. डिसेंबर २०२० ते जानेवारी २०२१ या कालावधीत विदयार्थ्यांना उपग्रह बनविणेबाबत संस्थेमार्फत ऑनलाईन मार्गदर्शन कण्यात आले होते.

या गौरव सोहळयासमयी उपआयुक्त शिक्षण अनंत कदम, प्रशासन अधिकारी जे.जे. तडवी, शिक्षण विस्तार अधिकारी विजय सरकटे व संबंधित शाळांतील शिक्षक वर्ग विदयार्थ्यांसमवेत उपस्थित होता.

- Advertisement -

हेही वाचा – रेस्टॉरंटच्या indoor dining मधून कोरोना पसरण्याचा धोका का वाढतो? टास्क फोर्सच्या सदस्याने मांडले मत


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -