कळव्यातील रस्त्यांवर खड्डे दाखवा अन् एक लाख रुपये मिळवा – जितेंद्र आव्हाडांचे आवाहन

दोन एकर जागेत दोन कोटी रुपये खर्चून तीन वर्षांच्या मुलांपासून मोठ्यापर्यंत विविध मैदानी खेळ खेळण्याचे संकुल ठाण्यातील कळवा- विटावा येथे महापालिकेच्या वतीने उभारलेल्या दिवंगत मुकुंद केणी क्रीडा संकुलाचे गृहनिर्माण मंत्री आव्हाड यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. यावेळी त्यांनी कळव्यातील रस्त्यांवर खडे दाखवा एक लाख रुपये घेऊन जा असे जाहीर आवाहन केले.

Jitendra Awhad Appeals Show potholes on roads in Kalavya and Get one lakh rupees

ठाणे: कळव्यातील रस्त्यांवर एक खड्डा दाखवा आणि एक लाख रुपये मिळवा असे जाहीर आवाहन राज्याचे गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी रविवारी कळव्यातील एका कार्यक्रमात देत, नाव न घेता शिवसेनेला टोला लगावला. तसेच आगामी विधानसभेच्या निवडणुकीत आपण लाखभर मतांनी निवडून येणार असे स्पष्ट करताना आपली विधानसभेची उमेदवारी आपणच आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हेच ठरवणार असल्याचेही त्यांनी यावेळी म्हटले. त्याचबरोबर राजकारणाचा वारा सुसाट असतो तो कधी दिशा बदलेल हे सांगता येत नाही असेही ते म्हणाले.

दोन एकर जागेत दोन कोटी रुपये खर्चून तीन वर्षांच्या मुलांपासून मोठ्यापर्यंत विविध मैदानी खेळ खेळण्याचे संकुल ठाण्यातील कळवा- विटावा येथे महापालिकेच्या वतीने उभारलेल्या दिवंगत मुकुंद केणी क्रीडा संकुलाचे गृहनिर्माण मंत्री आव्हाड यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. यावेळी त्यांनी कळव्यातील रस्त्यांवर खडे दाखवा एक लाख रुपये घेऊन जा असे जाहीर आवाहन केले. तसेच पुढे बोलताना, त्यांनी कळव्यातील प्रत्येक झोपडपट्टीत काँक्रीटीकरणाचे रस्ते आहेत. असे चांगलं कामे करून कळवावासीयांच्या हदयात बसण्याचे काम येथील नगरसेवकांनी केले आहे. कुठलीही अडचण असो येथील नगरसेवक २४ तास नागरिकांच्या पाठीमागे उभे असतात. याचा मला अभिमान आहे. तसेच आमची टीम ही सुपर काम करत असल्याने कधीही निवडणूक आल्या तरी येथील चार ते पाच पॅनल डोळे झाकून निवडून येतील असे असा विश्वास ही गृहनिर्माण मंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.

राजकारणात एक इंच जरी पाय हवेत गेला तर तुम्हाला वारा वर घेऊन जाईल. कारण राजकारणातील वारा हा सुसाट असतो आणि तो कधी दिशा बदले हे ही सांगता येत नाही.राजकारण हे असुरक्षित आहे. राजकारणात अस्थिरता झोपून देत नाही. म्हणून सांगतो पन्नाशीनंतर डायबिटीस, बीपी यासारखे आजार होतात पण राजकारणाचे व्यसन काही सुटत नाही. याचा अनुभव आपण घेतला असल्याचेही त्यांनी सांगितले.

तसेच आव्हाड हे कळवा- मुंब्रा येथील नगरसेवकांशिवाय अपूर्ण आहेत, तुमच्या कामापायी पुढच्या निवडणुकीत आपण लाखभर मतांनी निवडून येईल असेही म्हणाले. मी नेहमी म्हणतो कळवा-मुंब्रा बदलतो आहे, हे तेथे होणाऱ्या विविध उपक्रमांवरून दिसत आहे. त्याच्यासाठी तेथील लोकप्रतिनिधी कार्यक्षम आणि कर्तव्यदक्ष असावे लागतात. ती येथे असल्याने ही कामे होत असल्याचेही त्यांनी सांगितले.

तसेच ज्या ठिकाणी हे क्रीडा संकुल उभे राहिले आहे ती जागा अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांनी सोडलीच कशी असा सवालही उपस्थित केला, हे विश्व जरी स्वर्गीय मुकुंद केणी यांनी उभे केले. मात्र त्याला खरे स्वरूप त्यांचे चिरंजीव मंदार यांनी दिलेच पण,नगरसेविका प्रमिला केणी यांनी ही महापालिकेत पाठपुरावा करून ते काम पूर्ण करू घेतले. यावेळी आमदार आव्हाड यांनी स्वर्गीय आर आर पाटील उर्फ आबा यांच्या आठवणींना उजाळा दिला. आपण हात जोडले की समोरचाही आपोआपच हात जोडतो. हे त्यांनी शिकवले. तसेच नागरिकांप्रती आपलेपणा कसा असावा याचे ट्युशन आपण महेश साळवी यांच्याकडून घ्यावी असे म्हणून त्यांच्याकडून ती गोष्ट आपण शिकलो असेही सांगितले. त्याचबरोबर येत्या रविवारी कळवा,वाघोबानगर २५ लक्ष लीटरचे जलकुंभाच्या भूमिपूजन सोहळा होणार असल्याचे सांगितले.

याप्रसंगी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष व माजी खासदार आनंद परांजपे, नगरसेविक प्रमिला केणी, नगरसेवक मिलिंद पाटील, माजी महापौर मनोहर साळवी, मंदार केणी आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

 असे आहे हे संकुल

दोन एकर जागेत क्रिकेटसाठी ८२०० स्केअरफुटांचे टर्फ, फुटबॉल ६७०० स्के.फूट, बॅडमिंटन ४५००  स्के.फूटची वेगवेगळ्या प्रकारची बंदिस्त मैदाने तसेच क्रिकेट व कबड्डी, खो-खोसाठी मैदाने व धावण्यासाठी आतमध्ये एक किमीचा गोलाकार ट्रॅक तयार करण्यात आला आहे. तसेच जेष्ठ नागरिकांसाठी फिटनेस जीम मधील व्यायामाची आसने, ओपन जीम तर मुलांसाठी खेळण्याची साधने व आकर्षक उद्यान तयार करण्यात आले आहे. कळवा परिसरात हे  क्रीडासंकुल तयार झाल्याने येथील परिसरातील खेळाडूंना व उदयोन्मुख खेळाडूांना सराव करण्याची संधी मोफत उपलब्ध होणार आहे.


हेही वाचा – पंतप्रधान मोदींच्या पुणे दौऱ्यात पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाचे उद्घाटन; छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचेही अनावरण