…तर मी छातीचा कोट करून उभा राहीन, रेल्वेच्या झोपडीवासीयांच्या नोटीशीला जितेंद्र आव्हाड यांचे उत्तर

Jitendra Awhad told history about What are astik and nastik
भोंगे लावून किंवा हटवून महागाई कमी होणार आहे का? जितेंद्र आव्हाडांचा राज ठाकरेंना सवाल

गरीब माणुस आपल्या गरजेनुसार झोपडी बांधतो. डोक्यावर छत शोधतो. त्याच्यासाठी हा जीवनमरणाचा प्रश्न आहे. त्याच्या पोराबाळांच्या आयुष्याशी खेळता आहात. आम्ही नेहमीच पाठीशी उभे राहिले आहोत. मी मंत्री नंतर आहे, लोकांचा कार्यकर्ता आधी आहे. त्या एकाही माणसाला आम्ही घराच्या बाहेर पडू देणार नाही. कळवा मुंब्रा वासीयांच्या निवाऱ्याचा हक्क जर कोणी काढून घेणार असेल, तर मी छातीच्या कोट करून उभा राहीन, असे वक्तव्य गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केले. गरीबाला न्याय दिल्याशिवाय गप्प बसणार नाही. कळवा, मुंब्रा भागातील रहिवाशांना रेल्वेने दिलेल्या नोटीशीवर जितेंद्र आव्हाड बोलत होते.

न्यायालयाचा निर्णय दाखवून दाखवून रेल्वेने कळवा, मुंब्रा भागातील झोपडपट्टीवासीयांना नोटीस दिली आहे. जर सरकारी जमिनीवरील अतिक्रमण काढावे लागले, मुंबईतील ३० लाख ते ३५ लाख झोपड्या तोडाव्या लागतील. आम्ही नेहमीच गरीबांच्या पाठीशी उभे राहिले आहोत. त्याचे उदाहरण कळव्याने पाहिले आहे. कळव्यात जेव्हा ३५ हजार झोपड्या तोडण्याचा निर्णय झाला, तेव्हा आमच्या सरकारविरोधात आम्ही उभे राहिलो. तीन तास लोकल रोखून धरली आणि सरकारला निर्णय बदलायला भाग पाडले. आताही गरीबांवर अन्याय होऊ देणार नाही, असेही ते म्हणाले.

मिठागराच्या जमिनीवर इमारती नाहीच

मिठागरांच्या बाबतीत मुंबईच्या एकाही मिठागरावर इमारती उभ्या राहू देणार नाही, हे आमच्या सरकारचे धोरण आहे. पर्यावरणासाठी अनुकुल अशी मिठागरे आहेत. त्यामुळेच पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे असतील किंवा खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही या निर्णयाच्या समर्थनार्थ आहेत. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत मिठागरांच्या ठिकाणी इमारती उभ्या राहणार नाहीत, याबाबतचीही त्यांनी स्पष्टता दिली.