घरठाणेजितेंद्र आव्हाड यांनी महापालिका अधिकाऱ्यांवर कारवाई करावी; भाजपचे गटनेते मनोहर डुंबरे यांचे...

जितेंद्र आव्हाड यांनी महापालिका अधिकाऱ्यांवर कारवाई करावी; भाजपचे गटनेते मनोहर डुंबरे यांचे आवाहन

Subscribe

मंत्री आव्हाड यांनी ट्विटद्वारेच नाराजी न दाखवता प्रत्यक्ष कृती करावी, असे आवाहनही  डुंबरे यांनी केले.

गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ठाण्यातील अनधिकृत बांधकामांबाबत केलेले ट्विट स्वागतार्ह आहे. त्यातून महापालिका अधिकाऱ्यांच्या भ्रष्ट  कारभारावर प्रकाश पडला. मात्र, अनधिकृत बांधकामांना संरक्षण देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई कधी करणार, असा सवाल भाजपचे गटनेते मनोहर डुंबरे यांनी विचारला आहे. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केवळ ट्विट न करता राज्य सरकारच्या माध्यमातून कारवाईचा आसूड हाती घ्यावा, असे आवाहनही डुंबरे यांनी केले आहे.

गृहनिर्माण मंत्री म्हणून जितेंद्र आव्हाड यांनी येऊरमधील पाच अनधिकृत बंगले पाडल्याबद्दल महापालिकेचे स्वागत केले. मात्र, त्याचवेळी कोठारी कंपाऊंडमधील बार मालकांकडून अधिकारी लाखो रुपये घेतात, असा आरोप केला.
अनधिकृत बांधकामांप्रकरणी महापालिका अधिकाऱ्यांच्या भ्रष्टाचारासंदर्भात भाजपकडून होणाऱ्या आरोपावर मंत्री आव्हाड यांनी शिक्कामोर्तब केले. त्याबद्दल भाजपा मंत्रीमहोदयांचा आभारी आहे, असे डुंबरे यांनी म्हटले आहे. महापालिकेच्या कारभारावर राज्य सरकारचे नियंत्रण असते. तर राज्य सरकारमधील मंत्री म्हणून जितेंद्र आव्हाड हे सत्ताधारी आहेत. त्यांनीच महापालिका अधिकाऱ्यांकडून लाखो रुपये रुपयांची वसुली होत असल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे या भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई कधी होणार, असा सवाल मनोहर डुंबरे यांनी केला आहे.

- Advertisement -

महापालिकेच्या कारभारावर आव्हाड कुटुंब नाराज
यापूर्वी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या पत्नीने ऑक्सिजन नाही, रेमडेसिविर नाही, आपण रक्षणकर्ते आहात, ठाणेकरांचे जीव वाचवा, असे पोस्टर घेऊन महापालिका मुख्यालयासमोर उपोषण केले होते. आता मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी महापालिकेच्या भ्रष्ट कारभारावर बोट ठेवले. त्यामुळे आव्हाड कुटुंब महापालिकेच्या कारभारावर नाराज असल्याचे स्पष्ट होते. मंत्री आव्हाड यांनी ट्विटद्वारेच नाराजी न दाखवता प्रत्यक्ष कृती करावी, असे आवाहनही  डुंबरे यांनी केले.


हेही वाचा – राजीनाम्यानंतरही सरकारी बंगला सोडवेना !

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -