Eco friendly bappa Competition
घर ठाणे मुंबईप्रमाणेच ठाणेदेखील नवी ओळख निर्माण करणारे शहर करा - मुख्यमंत्री

मुंबईप्रमाणेच ठाणेदेखील नवी ओळख निर्माण करणारे शहर करा – मुख्यमंत्री

Subscribe

ठाणे शहर हे देखील मुंबईप्रमाणे एक नवीन ओळख निर्माण करणारे शहर करा. त्याला आंतरराष्ट्रीय दर्जाचे हे शहर करा, कारण ठाणे मुंबईला जोडलेले शहर आहे आणि म्हणूनच मला जी अपेक्षा आहे ती अपेक्षा आपण पूर्ण करा. त्यासाठी जे जे काही लागेल ते सरकार म्हणून देण्याचे काम केले जाईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी सांगितले.

ठाणे शहर हे देखील मुंबईप्रमाणे एक नवीन ओळख निर्माण करणारे शहर करा. त्याला आंतरराष्ट्रीय दर्जाचे हे शहर करा, कारण ठाणे मुंबईला जोडलेले शहर आहे आणि म्हणूनच मला जी अपेक्षा आहे ती अपेक्षा आपण पूर्ण करा. त्यासाठी जे जे काही लागेल ते सरकार म्हणून देण्याचे काम केले जाईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी सांगितले. (Just like Mumbai, make Thane a city that creates a new identity says Chief Minister)

‘मुख्यमंत्र्यांचे बदलते ठाणे’ या उपक्रमांतर्गत केंद्र सरकार, राज्य सरकार, ठाणे महापालिका, ठाणे स्मार्ट सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने शहरात विविध विकास कामे करण्यात आली आहेत. त्यात कोपरी मीठबंदर येथील खाडी सुशोभीकरण, गावदेवी भूमीगत वाहनतळ, कळवा खाडी सुशोभीकरण, छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय येथील प्रसूती कक्ष, शस्त्रक्रिया विभाग आणि वाचनालय, ज्ञानसाधना महाविद्यालय येथील उद्यान, परिवहन सेवेच्या विजेवरील बसगाड्या या प्रकल्पांचे शनिवारी मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.

- Advertisement -

याशिवाय नव्याने तयार करण्यात आलेले वाहतूक बेट आणि रस्ते मजबुतीकरण महत्वाकांक्षी प्रकल्पाचे भूमिपूजनही त्यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांची वागळे इस्टेट येथे सभा झाली. यावेळी त्यांनी उपस्थितांना संबोधित केले. ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील या राज्याच्या विकासासाठी खूप मोठ्या प्रमाणावर आर्थिक तरतूद केलेली आहे आणि म्हणून हे राज्य आणि केंद्र सरकार आता डबल इंजिनच सरकार म्हणून काम करते आहे आणि नक्की त्याचा फायदा या ठाणे शहराला देखील झाल्याशिवाय राहणार नाही. कारण आता तुमचा ठाणेकर मुख्यमंत्री झालेला आहे. 165 इलेक्ट्रिक व्हेईकल म्हणजे प्रदूषण मुक्त ठाणे करण्याची ही पहिली पायरी आहे, असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

ते पुढे म्हणाले की, मुंबई देशाची राजधानी आहे, या ठिकाणच्या रस्त्यांचा कायापालट केला जात आहे. पुढील अडीच वर्षात मुंबई खड्डे मुक्त होणार आहे. तसेच ठाण्यातील रस्ते देखील खड्डे मुक्त होण्याच्या दिशेने वाटचाल सुरु झाली आहे. तलाव सुशोभीकरणाचे कामही ठाण्यात हाती घेण्यात आले आहे. जोगीला तलावाचे पुनवुर्जीवण केले जात आहे. अशाच पध्दतीने ठाण्याची जी तलावांचे शहर म्हणून ओळख आहे, ती पुसु द्यायची नाही. चांगले रस्ते, सार्वजनिक शौचालये स्वच्छ झाली पाहिजे. त्यानुसार योग्यरित्या कामे करा, झोपडपट्टी भागातील सार्वजनिक शौचालयांकडे प्राधान्याने लक्ष द्या. ठाणे शहर हे बदलते आहे. रस्ते पावसाळ्यापूर्वी तयार झाले पाहिजे. काँक्रीटीकरणाची कामेही वेळेत करा. शहराचे एन्ट्री पॉईंट ही शहराची ओळख असते, त्यानुसार हे एन्ट्री पॉईंट ठाण्याची ओळख कशी होईल, यादृष्टीने प्रयत्न करा. ठाणेकरांची वाहतूक कोंडीतून सुटका करायची आहे. शासनाकडून जो काही निधी मिळाला आहे, त्याचा विनियोग करा, जनतेसाठी पैसा वापरला गेला पाहिजे. चांगले रस्ते, सुशोभीकरण, सार्वजनिक शौचालये आदींसह इतर कामे गुणवत्तापूर्ण झाली पाहिजेत. जे या कामात कचुराई करतील अशांचा हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नसल्याचा इशाराही त्यांनी दिला.

- Advertisement -

क्लस्टरला लवकरच सुरवात

क्लस्टरचा विकास लवकर केला जाणार आहे, यासाठी सिडकोला सोबत घेतले आहे. अडचणी दूर केल्या आहेत, त्यामुळे तातडीने या कामाला प्राधान्य देऊन सुरवात करा, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. आपल्याला संक्रमण शिबिरात राहावे लागेल, अशी नागरीकांना भिती वाटत आहे, मात्र त्यांना तेथे न राहता थेट हक्काच्या घरांच्या चाव्या दिल्या जाणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले.

कळव्यातील कार्यक्रमाला आव्हाड अनुपस्थित

मुख्यमंत्र्यांचे बदलते ठाणे या उपक्रमांतर्गत विविध विकासकामांचे लोकार्पण करण्यात आले. याचदरम्यान कळव्यातील कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे आमदार आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी अनुपस्थित राहिल्याचे पाहण्यास मिळाले. त्यांनी याबाबत समाजमाध्यमांवर प्रतिक्रिया व्यक्त करत ‘मला या गोष्टीचा आनंद आहे की, या सुंदर कामाचे उदघाटन मुख्यमंत्री करीत आहेत’, असे म्हटले.


हेही वाचा – कळवा छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाच्या अधिष्ठातासह उपअधिष्ठातांवर निलंबनाची कारवाई

- Advertisment -