घरठाणेप्रकाश पेणकर यांचं निधन : कल्याणमधलं रिक्षाचालकांचं नेतृत्व काळाच्या पडद्याआड

प्रकाश पेणकर यांचं निधन : कल्याणमधलं रिक्षाचालकांचं नेतृत्व काळाच्या पडद्याआड

Subscribe

रिक्षाचालक-मालक टॅक्सी युनियनच्या शाखेची निर्मिती करून रिक्षाचालकांसाठी पतपेढी देखील निर्माण केली होती.

रिक्षा चालक मालक टॅक्सी युनियनचे रिक्षाचालकांचे आधारस्तंभ असे शिवसेनेचे पालिकेतील सभागृहनेते स्थायी समितीचे माजी सभापती कल्याण शहर सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाचे संस्थापक असणारे प्रकाश तथा नाना पेणकर (६८) यांचे आज रुग्णालयात उपचार सुरू असताना दुःखद निधन झाले. ऐन गणेशोत्सवापूर्वी त्यांचे निधन झाल्याने सार्वजनिक गणेशोत्सव मंडळावर दुखाचे सावट पसरले आहे. गेल्या काही महिन्यापासून नाना यकृताच्या आजारावर उपचार घेत होते. तीन महिन्यापूर्वी त्यांच्या एका मुलाने यकृत प्रत्यारोपण केले होते.

कल्याण तसेच ठाणे जिल्ह्यातील प्रमुख शहरात रिक्षाचालक-मालक टॅक्सी युनियनच्या शाखेची निर्मिती करून रिक्षाचालकांसाठी पतपेढी देखील निर्माण केली होती. कल्याण शहरात युनियनचे नावारूपाला आलेल्या नावामागे रिक्षाचालकांनी मोठी ताकद त्यांना दिल्याने कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत प्रथमच अपक्ष नगरसेवक म्हणून निवडून गेल्याने त्यानंतर शिवसेनेकरिता ते काम करू लागले. सभागृहनेते तसेच स्थायी समितीचे सभापती पदही त्यांनी भूषविले होते. त्यांच्या अकस्मात जाण्याने शिवसेना तसेच रिक्षाचालकांचे खंबीर नेतृत्व हरपल्याची भावना निर्माण झाली आहे.

- Advertisement -

कल्याण डोंबिवली मोहने टिटवाळा आदी भागात रिक्षाचालकांनी रिक्षा बंद करण्याचा निर्णय घेतला. आज रात्री ९ वाजता त्यांच्यावर बैलबाजार स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार असून नाना यांच्या पश्चात त्यांची पत्नी दोन मुले असा परिवार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -