Tuesday, June 6, 2023
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी करिना कपूरने बॉलिवूडमध्ये केली २० वर्षे पूर्ण

करिना कपूरने बॉलिवूडमध्ये केली २० वर्षे पूर्ण

Subscribe

नुकतेच करीना कपूरने आपल्या करिअरमध्ये २० वर्ष पूर्ण केली आहेत. तसेच चित्रपट क्षेत्रातील तिच्या दिर्घायुष्यामागील कारण हे माझे चाहते आहेत असेही ती म्हणाली.

अभिनेत्री करीना कपूर खान ही बॉलिवूडची स्टाइल आयकॉन आणि ग्लॅमरस अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. करीनाने बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. नुकतेच करीनाने बॉलिवूड चित्रपटसृष्टीत २० वर्ष पूर्ण केली आहेत. यावर करीना म्हणाली की, ही माझ्यासाठीही सन्मानजनक आणि अतिशय चांगली गोष्ट होती. माझ्या या यशाचं कारण चाहते आहेत. दोन शतके माझे चाहते माझ्या पाठीशी उभे राहिले आहेत, असेही ती म्हणाली.

प्रेक्षकांच्या पाठिंब्यामुळे आज इथे आहे – करीना 

करीनाने २००० साली आलेल्या रिफ्यूजी चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. जब वी मेट, कभी खुशी कभी गम, तलाश, युवा, ओमकारा आणि उडिता यांसारखे अनेक हिट चित्रपट तिने दिले. २०१६ मध्ये आई झाल्यानंतर ती एक वर्ष मोठ्या पडद्यापासून दूर होती. लग्न आणि मूल झाल्यावर पुन्हा चाहत्यांनी मला जे प्रेम ते पाहून मला आनंद झाला. हे माझ्या चित्रपटसृष्टीतील दीर्घायुष्याचे कारण आहे. माझ्या प्रेक्षकांनी नेहमीच मला पाठिंबा दर्शविल्यामुळे मी आज इथे आहे. तसेच या प्रवासात मला सैफने साथ दिली आहे. तो माझ्या बरोबर प्रत्येक परिस्थितीत खंबीरपणे उभा राहिला,असे करीना एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखती दरम्यान म्हणाली.

- Advertisement -

लवकरच करीना बॉलिवूड अभिनेता अमिर खानसोबत ‘लाल सिंह चड्डा’ या आगामी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये ती एका वेगळ्या भूमिकेतून समोर येणार आहे. ‘लाल सिंग चड्ढा’ नंतर ती करण जोहरच्या ‘मॅग्नेम ऑप्ट तख्त’वर काम करण्यास सुरुवात करणार आहे. २००१ च्या ‘कभी खुशी कभी गम’ नंतर करणबरोबर बर्‍याच वर्षानंतर पुन्हा एकदा काम करणार आहे.

- Advertisement -


हेही वाचा- भूमी पेडणेकर न्यूड फोटोमुळे पुन्हा एकदा चर्चेत


 

- Advertisment -