घरताज्या घडामोडीकर्जत : परस्पर पाण्याची पाईपलाईन टाकल्याने नगरपरिषदेने केली कारवाई

कर्जत : परस्पर पाण्याची पाईपलाईन टाकल्याने नगरपरिषदेने केली कारवाई

Subscribe

आरटीआय अध्यक्ष अमोघ कुळकर्णी यांनी आवाज उठविताच क्षणी नगरपरिषदेला आली जाग

कर्जत नगरपरिषद हद्दीतील भिसेगाव येथे अरिहांत अलोकी या इमारतीचे बांधकाम मोठ्या प्रमाणात सुरू आहे. सदरील काम पूर्णत्वास आले असताना या इमारतीला नगरपरिषदेकडून ३४ नळ कनेक्शन देण्यात आले होते. मात्र पुढील पाण्याची पाईपलाईन टाकण्यासाठी बस आगाराची आणि नगरपरिषदेची परवानगी न घेता रातोरात ही वाढीव पाईपलाईन टाकल्याने भिसेगावकरांना भविष्यात पाणी टंचाईला सामोरे जावे लागेल म्हणून आरटीआय अध्यक्ष अमोघ कुळकर्णी यांनी आवाज उठवला आहे. नगरपरिषदेच्या पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना बोलावून पाईपलाईन काढून टाकण्यात आली.
मागील काही महिन्यांपूर्वी कर्जत नगरपरिषदेने भिसेगाव येथील अरिहंत अलौकि या इमारतीला नळ कनेक्शन देण्यात आले होते. परंतु सदरचे कनेक्शनसाठी नगरपरिषद कर्मचारी तिथे गेले असता मुख्य पाईप लाईनपासून जोडण्यात येणारे पाईप हे कर्जत बस डेपो आगार यांच्या जमिनीमधून जाते. त्यांनी बस डेपोचे आगार प्रमुख शंकर यादव यांनी वारंवार पोलीस ठाण्यात आणि नगरपरिषदेमध्ये पत्रव्यवहार करून पोलीस बंदोबस्त देऊन सदरचे काम थांबविण्यात आले होते. यामुळे या पाईप लाईनला कर्जत बस आगाराकडून ना हरकत दाखला नसल्याने त्यांनी काम थांबवले. मात्र बिल्डरांनी मनमानी कारभार करून रातोरात नळाचे पाईपलाईन टाकण्यात आली असून, याबाबत बस आगाराचे प्रमुख शंकर यादव यांनी पुन्हा नगरपरिषदेला आणि पोलीस ठाण्यात, तहसीलदारांना पात्र देण्यात आले.
 नगरपरिषद कर्मचारी यांच्या मार्फत मुख्यलाइन पासून पाइप न जोडता खासगी स्वतःचे प्लम्बर बोलूंन पाईप लाईन टाकून घेतली आहे. सर्व सामान्य व्यक्तीला नळ कनेक्शन घेण्यासाठी अनेक नियमावली पार पाडून सर्व प्रकारची परवानगी घेऊन त्यांनंतरच पाईपलाईनचे कनेक्शन दिले जाते. मात्र भिसेगाव येथील अरिहंत अलोकि या इमारतीला अनधिकृत पाईपलाईन टाकण्याची परवानगी कोणी दिली. याला नक्की वरदहस्त कोणाचे आहे असा प्रश्न आरटीआय चे अध्यक्ष अमोघ कुळकर्णी यांनी उपस्थित केला असून सदरच्या इमारतीवर गुन्हा नोंद झाला पाहिजे. ज्या प्रमाणे इमारतीच्या बिल्डरांनी परस्पर पाईपलाईन टाकून घेतली आहे त्या प्रमाणे आजूबाजूच्या परिसराला , इमारतीला पाण्याच्या टंचाईला सामोरे जावे लागण्याची दाट शक्यता आहे. भिसेगाव हे चढणीवर परिसर असल्याने याठिकाणी पाण्याचा दाब आधीच कमी येत आहे. त्यात या इमारतीने पाईपलाईन चार इंचापेक्षा जास्त टाकून घेल्याने आता तर भिसेगावाना पाणी मिळणे कठीण होणार आहे. याला जबाबदार कोण असणार आहे.
यासंदर्भात आरटीआय अध्यक्ष अमोघ कुळकर्णी यांनी नगरपरिषदेच्या पाणी पुरवठा विभागाचे अशोक भालेराव यांना बोलावून सदरील इमारतीने टाकलेल्या परस्पर पाण्याची पाईपलाईन त्वरित काढण्यात काढण्यात आली आहे. तसेच बिल्डरावर कारवाई करण्यात यावे.अशी मागणी आहे.
           
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -